क्राईम

Crime News: दरोडा, जबरी चोरी, घर फोडीचे 15 गुन्हयात पाहिजे असलेला अट्टल गुन्हेगार हा खुनासहीत दरोडयाचे गुन्हयात झाला अटक, 05 गुन्हे आले उघडकीस

प्रतिनिधी(महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): शिक्रापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४५/२०२४ भा.दं.वि.का.क. ३०२, ३९७ प्रमाणे दि. २३/०४/२०२४ रोजी दाखल असून सदर गुन्हयात जातेगाव बु॥ ता. शिरूर जि पुणे येथील एक वृद्ध महिला घरात झोपलेली असताना रात्रीचे वेळी अज्ञात चोरटयांनी अनाधिकाराने घरात प्रवेश करून तिला मारहाण करून घरात चोरी केली होती. सदर घटनेत वृद्ध महिला नामे कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले (वय ७६ वर्षे) या मयत झाल्या आहेत.

सदर गुन्हयाचे घटनास्थळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, एस.डी.पी.ओ. प्रशांत ढोले, शिरूर विभाग यांनी भेट दिली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनेची पुर्ण माहिती घेवून योग्य त्या सुचना दिल्या. अशा प्रकारच्या गुन्हे कार्यपद्धतीचा अवलंब करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करणे तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. सदरचा गुन्हा गंभीर होता. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतृत्वाखाली दोन पथके तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशन कडील एक पथक अशी एकूण तीन पथके तयार करणेत आली. ग्रामीण भाग असल्याने सीसीटीव्ही फुटेजचा अभाव होता. गोपनीय बातमीदार सतर्क करून तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अविनाश रमेश काळे, प्रविण दिपक भोसले यांनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने केला आहे. बातमीचे आधारे आरोपी नामे १) प्रविण दिपक भोसले (वय २१ वर्षे) रा. जातेगाव फाटा, चाकण-शिक्रापूर रोड ता. शिरूर, जि पुणे २) विधीसंघर्षीत वालक यांना सांगली येथून स्था.गु.शा.चे पथकाने ताब्यात घेतले. त्यांचेकडील तपासादरम्यान मिळाले माहितीवरून ३) अविनाश ऊर्फ लंगडया ऊर्फ गिल्या रमेश काळे (वय २८ वर्षे) रा. कोळगाव मोहरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर यास कोळगाव येथून स्थागुशा चे पथक व शिक्रापूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपी अविनाश ऊर्फ लंगड्या रमेश काळे हा एकूण १५ गुन्हयात पाहिजे आरोपी असून तो मालमत्ता चोरीचे गुन्हयातील सराईत गुन्हेगार आहे. या आरोपीकडून दरोडा, घरफोडी चोरीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, एस.डी.पी.ओ. प्रशांत ढोले, शिरूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पो.नि. रतनदिप गायकवाड, स्था.गु.शा.चे सपोनि राहूल गावडे, कुलदीप संकपाळ, योगेश लंगुटे, अमित सिदपाटील, शिक्रापूर पो स्टे चे सपोनि केशव वाबळे, सतिश पवार, पोसई महेश डोंगरे, स्थागुशा कडील अंमलदार बाळासाहेब कारंडे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजु मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, स्वप्निल अहीवळे, अभिजीत एकशिंगे, संजू जाधव, योगेश नागरगोजे, दिपक साबळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, आसिफ शेख, राहुल घुबे, धिरज जाधव, अक्षय नवले, सागर धुमाळ, संदिप वारे, निलेश सुपेकर, अक्षय सुपे, काशिनाथ राजापूरे, शिक्रापूर पो स्टे कडील अंमलदार अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहीदास पारखे, विकास पाटील, निखील रावडे, यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button