आपला जिल्हा
News: पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मे महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे २ व ३ मे, मंचर येथे ६ व ७ मे, जुन्नर येथे १५ व १६ मे, वडगाव मावळ येथे २० व २१ मे तर लोणावळा येथे २७ व २८ मे या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.