News: जेजुरी: तीर्थक्षेत्र श्री कडेपठार गडावर विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी या न्यासामार्फत तीर्थक्षेत्र श्री कडेपठार गडावर विविध उपक्रमांचे अनावरण जनरल (डॉ.) विजय पवार AVSM, VSM यांच्या व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे मा. धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्या हस्ते संपन्न झाले.
जेजुरी श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी यांच्या वतीने वार शनिवार दिनांक २७/०४/२०२४ रोजी तीर्थक्षेत्र श्री कडेपठार निवासी (मुळपीठ) श्री. खंडोबा मंदिरात न्यासामार्फत सुरु करण्यात येणाऱ्या काही उपक्रमांचे उदघाटन आणि लोकार्पण करण्यात आले. उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जनरल (डॉ.) विजय पवार AVSM, VSM तसेच श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी न्यासाचे प्रमुख विश्वस्त वाल्मिक लांघी, म्हाळसाकांत आगलावे, श्री. मार्तंड देवस्थान जेजुरी संस्थांन चे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदाडे, विश्वस्त पांडुरंग थोरवे उपस्थित होते.
मागील दोन वर्षात न्यासाने अनेक सोई सुविधा आणि अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत, भाविकांना दररोज मोफत अन्नदान, ५०० झाडांची देवराई (ठिबक सिंचन योजना, देवराईस जाळी कुंपण), केवळ मंदिरासाठी थ्री फेज जोडणी, पायरी मार्ग दुरुस्ती, मुबलक पथदिवे, शाळा – महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांना बरोबर घेऊन स्वच्छता मोहीम , सी सी टीव्ही कॅमेरा या सुविधा उपलब्ध करून दिल्या.

नवीन आणि उपयुक्त उपक्रमांचे अनावरण आणि लोकार्पण सोहळा गडावर पार पडला.
- श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट जेजुरी या न्यासाच्या “अधिकृत वेबसाईट”चे अनावरण झाले. यावेळी वेब साईट डेव्हलपर राहुल खोमणे (डीपमाइंड्स इन्फोटेक प्रा. ली.) उपस्थित होते.
- “तेल घाणा” उपक्रमाचे अनावरण (मंदिरात भाविकांनी मनोभावे उधळलेल्या आणि आपसूक जमा होणाऱ्या, पुढे बऱ्याचदा पायदळी येऊन कचऱ्यात जाणार्या खोबऱ्यास आधीच जमा करून यापासून तेल काढून तेच तेल मंदिरातील दिवे, समया, दीपमाळा याकरिता वापरता येईल.) यावेळी ज्यांनी न्यासाला तेलघाणा दान रूपाने बहाल केला ते परेश गरुड, अध्यक्ष अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना , पुणे हे उपस्थित होते.
- “निर्माल्या पासून सुवासिक अगरबत्ती, धूप कोन उपक्रमाचे अनावरण देखील झाले. यावेळी अगरबत्तीचे उत्पादक श्रीराम कुंटे उपस्थित होते. या उपक्रमांचे लोकार्पण झाले.
यावेळी सर्व मान्यवरांनी वर नमूद उपक्रमांचे कौतुक करून न्यासाला पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन अजय भारदे यांनी केले. उमेश गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर रामचंद्र दीडभाई, सदानंद सुरेश बारभाई, हृषिकेश चिंतामण सातभाई, वैभव लांघी यांनी परिश्रम घेतले. प्लास्टिकमुक्त कडेपठार असा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता झाली. मल्हारभक्तांच्या उपस्थितीत हा सोहोळा पार पडला.