Crime News: जेजुरी: अवैध गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; 2,98,150/- किमतींचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत भोसलेवाडी येथे गावठी हातभट्टी दारूची भट्टी मिळून आली असून सुमारे 2,98,150/- रु. किमतींचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी प्रविण श्रीमंत शेंडे, पोकॉ/1714, नेमणुक जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनी आरोपी हरीश्चंद्र अण्णा राठोड (वय 42 वर्षे) रा. भोसलेवाडी ता.पुरंदर, जि.पुणे यांच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 28/02/2024 रोजी रात्री 01/45 वा मौजे भोसलेवाडी गावचे हददीत इसम नामे हरीश्चंद्र अण्णा राठोड (वय 42 वर्षे) रा भोसलेवाडी ता.पुरंदर जि.पुणे याची ओढयाचे कडेला शिंदे यांचे विहीरीचे शेजारी झाडाच्या झुडपाच्या आडोशाला दारू तयार करण्याची भट्टी मिळुन आली तेथील साहीत्य एस.एल.पुजारी पोलीस उपनिरीक्षक यांनी दोन पंचांचे समक्ष जागीच जप्त करून, जप्त 2 लोखंडी पातले मधील गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व निळे रंगाच्या प्लॅस्टीक कॅन्ड मधील गावठी हातभटट्ची तयार दारू मधील प्रत्येकी एक 180 मि.ली मापाच्या काचेच्या वेगवेगळया बाटली मध्ये सॅम्पल करीता काढुन घेवुन जप्त गावठी हातभट्टीची तयार दारू व गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायणन, लाकडी सरपण हे जागीच पंचांचे समक्ष नष्ट करण्यात आले आहे. म्हणुन माझी इसम नामे हरीश्चंद्र अण्णा राठोड (वय 42 वर्षे) रा भोसलेवाडी ता.पुरंदर जि.पुणे यांचे विरूध्द भा.द.वि.क 328 सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(फ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.
सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सपोनि दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई तारडे हे करत आहेत.