क्राईम

Crime News: जेजुरीसह परिसरातील गावात चोरट्यांचा सुळसुळाट; बेलसर येथे बंद घराचे कुलूप तोडून 1,15,000/- रुपयांचे सोने चांदीचे दागिने लंपास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील बेलसर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून 1,15,000/- रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत फिर्यादी लोकेश संजय रणदिवे (वय 28 वर्ष) रा. बेलसर, ता.पुरंदर, जि. पुणे यांनी अज्ञात चोरटा याच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 15/01/2024 रोजी बेलसर ता. पुरंदर जि. पुणे येथून फिर्यादी यांचे राहते घरातून कोणी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीचे इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून लाकडी व लोखंडी कपाटात ठेवलेली सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. गेला माल –


1)50,000/- रुपये एक तोळे वजनाचे सोन्याची वेढनी असलेले जु. वा. किं. अं.
2) 40,000/- रुपये एक दीड तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र असलेले जु. वा. किं. अं.
3) 25,000/-रुपये 500 रुपये दराच्या व 100 रुपये दराच्या नोटा असलेली रोख रक्कम असे एकूण 1,15,000/- चे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु र नं. 08/2024 भा.द.वि. कायदा कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल केला आहे.

सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई पुजारी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button