Uncategorized

जेजुरी: कडेपठार खंडोबा मंदिरात देवदिवाळी निर्मित श्रीराम मंदिराचा देखावा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र जेजुरी कडेपठार मंदिरात चंपाषष्ठी उत्सव सुरू असून शनिवार दिनांक १६ रोजी देवदिवाळी निमित्त श्री क्षेत्र आयोध्या येथील प्रभु श्रीरामाच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा सादर करण्यात आला असून या देखाव्यात आयोध्या येथून आलेला मंगल अक्षदा कलश भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी येथील जुनागड कडेपठार येथे खंडोबा देवाचे मूलस्थान आहे. या मंदिरात चंपाषष्ठी उत्सवानिमित्त सहा दिवस विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चंपाषष्ठीउत्सवातील देव दिवाळी निमित्त कडेपठार मंदिरात श्रीराम मंदिराची प्रतिकृती, प्रभु श्रीराम, माता सीता, लक्ष्मण तसेच रामभक्त हनुमान यांच्या मुर्ती यांच्या मूर्ती बरोबरच फळे, फराळ, मिठाई यांची आरास करण्यात आली. तसेच आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे पूजन करून तो भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

श्रीराम मंदिर देखव्यासाठी जेजुरी येथील श्रीराम मंदिरातून श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमानाच्या मूर्ती पालखी ठेवून कडेपठार रोंगर रांगेतून मिरवणूक काढून कडेपठार मंदिरात आणण्यात आल्या. या मूर्ती कडेपठार मंदिरात आणताच वाजत गाजत भंडाराची उधळण करण्यात आली. तसेच आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे पूजन करून हा मंगल कलश भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

कडेपठार खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सवा निमित्त खंडोबा व म्हाळसा देवींच्या उत्सव मूर्तीची घट स्थापना करण्यात आली असून दररोज मार्तड विजय ग्रंथाचे पारायण, त्रिकाळ पूजा अभिषेक, वाघ्या मुरुळींचा जागर, लोक कलावंतांची भक्ती गीते, महाप्रसाद आदी उपक्रम सुरू आहेत.

या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन श्री कडेपठार चंपाषष्ठी अन्नदानसेवा मंडळ, श्री क्षेत्र कडेपठार देवस्थान, पुजारी, सेवेकरी वर्ग, समस्त ग्रामस्थ मानकरी, खांदेकरी मंडळ, जेजुरी यांच्यातर्फे करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button