क्राईम

Crime News: अनोळखी मयताची ओळख पटण्यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींच्या मुसक्या आवळून खुनाचे गुन्हयाचा केला उलगडा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ११०४/२०२३ भा.दं.वि.का.क. ३०२,२०१ प्रमाणे दि. २९/१०/२०२३ रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला होता. सदर गुन्हयातील मयत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. त्यामुळे गुन्हयाची उकल करणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. मयत प्रेत हे न्हावरा केडगाव जाणारे रोडवरील पारगाव पुलाखाली भिमा नदीपात्रात मिळाल्याने नक्की गुन्हा केव्हा घडला याबाबत संभ्रम निर्माण झाला. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला मार्गदर्शन व सुचना केल्या होत्या.

गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच तांत्रिक विश्लेषण करणेत आले. सलग आठ दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्या दरम्यान एक संशयित चारचाकी पिकअप वाहन निदर्शनास आले. सदरचे पिकअप वाहन हे सुपा टोल नाका बाजुकडे गेल्याचे आढळून आल्याने सुपा टोलनाका परीसरात चौकशी करता, मयत इसम हा टोलनाक्या जवळील हॉटेल सौंदर्या इन येथे कामास असल्याची माहिती मिळाली. हॉटेल सौंदर्या इन हे १) बापू भिमाजी तरटे (वय ३६ वर्षे) रा. पळवे खु ॥ ता. पारनेर, जि. अहमदनगर २) निलेश माणिक थोरात (वय २६ वर्षे), रा. मुंगशी, ता. पारनेर जि. अहमदनगर यांनी चालविण्यासाठी घेतलेले असल्याने त्यांचेकडे चौकशी करण्यास सुरूवात केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे प्रथम कबुल केले. मयताचे नाव संतोष आप्पासाहेब गाडेकर रा. टोकवाडी ता. मंठा, जि. जालना असे असल्याचे निष्पन्न झाले, मयत संतोष गाडेकर याने हॉटेलवर काम करण्यासाठी आगाऊ रक्कम घेतलेली होती, परंतु तो काम करत नसल्याने त्यास मारहाण करून त्याचा खून केला आणि पिकअप वाहनातून त्यास पारगाव पुलावरून भिमा नदीपात्रात त्याचे मयत प्रेत टाकून देण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले असून दोन्ही आरोपींना मयताची विल्हेवाट लावणेसाठी वापरणेत आलेले पिकअप वाहनासह शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पुणे विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पो स्टे चे पो नि संजय जगताप, स्था.गु.शा. कडील पो.स.ई. गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, अतुल डेरे, राजु मोमीण, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button