Crime News: जेजुरी: अवैध गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांची कारवाई; 4,26,500/- किमतींचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपरी खुर्द गावच्या हद्दीत कॅनलच्या कडेला गावठी हातभट्टी दारू तयार करण्याची भट्टी मिळवून आली असून याबाबत फिर्यादी विजय तुकाराम कांचन, पो.हवा/1967 नेमणुक – स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी आरोपी नागेश बरकडे पुर्ण नाव माहीत नाही रा.पिसुर्टी ता. पुरंदर, जि.पुणे याच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये मध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन मिळालेल्या माहितीनुसार, दि. 01/03/2024 रोजी रात्री 02/00 वा मौजे पिंपरे खुर्द गावचे हददीत, इसम नामे नागेश बरकडे रा. पिसुर्टी, ता.पुरंदर, जि. पुणे याची कॅनलच्या कडेला असणाऱ्या दिनेश तांबे यांचे उसाचे शेती शेजारी झाडाच्या झुडपाच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू तयार करायची भट्टी मिळुन आली तेथील साहीत्य पोलीस उपनिरीक्षक एस.एल.पुजारी यांनी दोन पंचांचे समक्ष जागीच जप्त करून जप्त 2 लोखंडी पातले मधील गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व निळे रंगाच्या प्लॅस्टीक कॅन्ड मधील गावठी हातभटट्ची तयार दारू मधील प्रत्येकी एक 180 मि. ली मापाच्या काचेच्या वेगवेगळया बाटली मध्ये सॅम्पलकरीता काढुन घेवुन जप्त गावठी हातभट्टीची तयार दारू व गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायणन, लाकडी सरपण हे जागीच जे.सी.बी च्या साहयाने पंचांचे समक्ष नष्ट करण्यात आले आहे. यावरून इसम नामे नागेश बरकडे पुर्ण नाव माहीत नाही रा.पिसुर्टी ता. पुरंदर, जि. पुणे यांचेविरूध्द भा.द.वि.क 328 सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सपोनि वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई पुजारी हे करत आहेत.