Crime News: पुरंदर: मिरची पूड डोळ्यात टाकून शिवीगाळ करत मारहाण करून मोटरसायकल जाळुन नुसकान

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील निरा ता. पुरंदर, जि. पुणे येथे पालखी तऴाचे जवऴ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक निरा नदीच्या पुलाजवऴ लोंणद निरा -जेजुरी रोडचे कडेला साईट पट्टीवर डोळ्यात मिरची पूड टाकून शिवीगाळ करत मारहाण करून मोटार सायकल जाळ्याची घटना घडली असून याबाबत फिर्यादी सचिन संपत कोरडे (वय-42 वर्षे) व्यवसाय-शेती, रा. खंडोबाची वाडी, ता. बारामती, जि. पुणे यांनी आरोपी अक्षय शेवाळे रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे यांच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन वरून मिळालेल्या माहितीनुसार दि. 19/7/2024 रोजी रात्री 09:50 वा सुमारास मौजे निरा ता. पुरंदर, जि. पुणे पालखी तऴाचे जवऴ डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक निरा नदीच्या पुलाजवऴ लोंणद निरा -जेजुरी रोडचे कडेला साईट पट्टीवर माझे वडील संपत दगडु कोरडे यांना ट्रक मधुन खाली उतरवित असताना अक्षय शेवाऴे पुर्ण नाव माहीत नाही रा. निरा ता. पुरंदर, जि. पुणे हा माझ्या जवऴ येवुन काही एक कारण नसताना मिरची पुड माझे डोऴ्यात टाकुण मला शिवीगाऴ दमदाटी करुन माझे डोक्यात हातातील लोंखडी कडे मारुण आपखुशीने दुखापत केली त्यावेऴी माझे वडील संपत दगडु कोरडे हे भांडण सोडविण्यास आले असता त्याच्या ही डोऴ्यात मिरर्ची पुड टाकुण त्यांना ही शिवीगाऴ दमदाटी करुन हाताने मारहाण करुन ढकलुन दिले त्यावेऴी मी तेथुन पऴुन गेलो त्यावेऴी माझ्या मालकीची मोटार सायकल TVS कंपनीची आपाची मॉडेलची तीचा आरटीओ नं एम एच 42 एस 3494 निरा -शिवाजी चौक ग्रामपंचायत सर्कल जवऴ जाऴुन नुकसान केले माझी अक्षय शेवाऴे पुर्ण नाव माहीत नाही रा. निरा ता. पुरंदर, जि. पुणे याचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु र नं 268/2024 भारतीय न्यायसंहिता कायदा 2023 कलम 115, 118(1), 326(F), 352, 351(2)351(3) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो स ई पुजारी हे करत आहेत.