Crime News: अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारे दोन आरोपी जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक २७/०४/२०२४ रोजी सायं ०५.३० वा ते दिनांक २८/०४/२०२४ रोजी ०१.३० वा पर्यंत. पिडीत निर्भया १ व तिची मैत्रिण पिडीत निर्भया २ हिस आरोपी नामे अजय भिकेन दौड (वय २९ वर्षे), रा. सातकरस्थळ, ता. खेड, जि.पुणे व आरोपी क २ श्रीराम संतोष होले, (वय २३ वर्षे), रा. होलेवाडी, ता. खेड, जि.पुणे यांनी आपण फिरायला जावु असे म्हणुन फुस लावुन त्यांचे मोटार सायकल नंबर माहीत नाही यावर बसवुन शिरूर येथे नेवुन आरोपी क्र ३ किरण पुर्ण नाव पत्ता माहीत नाही याचे कडुन इंजेक्शन व बोटल घेवुन तेथुन एका डोंगरावर नेवुन तेथे त्यांनी शिरूर येथे आणलेले इंजेक्शन निर्भया १ हिला देण्याचा प्रयत्न करून निर्भया क्र. १ हिने इंजेक्शन घेतले नाही. म्हणुन तिची मैत्रिण निर्भया २ हिस तु जर इंजेक्शन घेतले नाही तर तुला इथेच सोडुन जावु अशी धमकी देवुन तिचे दोन्ही हातावर इंजेक्शन देवुन तेथुन मौजे जैदवाडी गावच्या हद्दीत ता. खेड, जि. पुणे येथील एका लॉजवर घेवुन जावुन तेथे लॉजच्या दोन रूम बुक करून आरोपी अजय दौड यांने निर्भया १ हिला एका रूममध्ये नेवुन तसेच आरोपी श्रीराम होले याने निर्भया २ हिला दुसऱ्या रूममध्ये जबरदस्तीने नेवुन दोघांनीही जबदस्तीने शारीरीक सबंध केले वगैरे मजकुरावरून खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३१०/२०२४ भा.द.वि कलम ३६६ अ ३७६ (२) (जे), ३२८, ५०६, ३४ सह बाल लैगिंक अत्याचारापासुन बालकाचे संरक्षण २०१२ चे कलम ४, ६, ८, १० प्रमाणे गुन्हा दिनांक १६/०५/२०२४ रोजी रात्रौ ०१.२० वा दाखल करण्यात आला असुन यातील आरोपी नामे अजय भिकेन दौड (वय २९ वर्षे), रा. सातकरस्थळ, ता. खेड, जि. पुणे. व आरोपी क २ श्रीराम संतोष होले, (वय २३ वर्षे), रा. होलेवाडी, ता. खेड, जि.पुणे यांचा शोध घेण्याकरीता दोन तपास पथके तयार करून त्यांचा गोपनिय बातमीदारामार्फत शोध घेतला असता दोन्ही आरोपींना एक तासाचे आत जेरबंद करण्यात आले असुन आरोपी क्र ३ किरण पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही याचा शोध घेणेकरीता एक पथक रवाना करण्यात आलेले आहे. सदर आरोपींना मा. न्यायालयाचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची दिनांक १८/०५/२०२४ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे.

सदरची कारवाई पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधिक्षक, पुणे विभाग, सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग खेड यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन, महीला पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख, पोलीस उपनिरीक्षक डी. एन. राउत, पो. कॉ. रामदास बोऱ्हाडे ब.नं. २३१२, पो. ना. प्रविण गेंगजे ब.नं.२४७४, पो. कॉ. एस डी बांडे ब.नं.२३५३, पो. कॉ. स्वप्निल लोहार ब.नं.१४१७, पो. कॉ. सागर शिंगाडे ब.नं. १३९४, महीला पो.ना. निलम वारे, यांच्या पथकाने केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास महीला पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख नेमणुक खेड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.