Crime News:भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक २७/०६/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजण्याच्या पूर्वी (नक्की वेळ माहित नाही) मौजे यवत ता. दौड जि. पुणे गावचे हद्दीत भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन एक अनोळखी इसम, यय अंदाजे ३० ते ३५ वर्षे (नाव व पत्ता माहित नाही.) यास तीव्र धारदार अज्ञात हत्याराने हल्ला करुन संपुर्ण डोक्यावरती, उजवे छातीवर, पाठीवर, वार करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने कोणत्यातरी अज्ञात ज्यालाग्रही पदार्थ मयताचे शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवुन जीवे ठार मारले आहे. म्हणुन फिर्यादी नामे पो. हवा. विनायक हाके यांनी सरकारतर्फ अज्ञात आरोपीविरुध्द यवत पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ५५३/२०२५ अन्वये दि. २७/०६/२०२५ रोजी कायदेशीर तक्रार दिली होती.

तरी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचे आधारे विश्लेषण करून तसेच इतर जिल्ह्यातील दाखल मानव मिसिंगची तपासणी सुरू असताना ढोकी पोलीस स्टेशन, जिल्हा धाराशिव येथील मानव मिसिंग रजिस्टर क्रमांक २२/२०२५ अन्यये दाखल मिसिंग मधील मिसिंग नामे लखन किसनराव सलगर (वय २४ वर्ष), रा. टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव हा सदर गुन्ह्यातील अनोळखी मयत इसम असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता इसम नामे १) योगेश दादा पडळकर, (वय २५ वर्षे) २) राजश्री योगेश पडळकर, (वय २३ वर्ष) दोघे रा. माळशिरस ता. पुरंदर जि. पुणे ३) विकास आश्रुबा कोरडे, (वय २१ वर्ष) रा. आनंदवाडी टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव ४) शुभम उमेश वाघमोडे, (वय २२ वर्षे), रा. मुरुड ता. जि. लातूर ५) काकासाहेब कालिदास मोटे (वय ४२ वर्ष) ग. येवती ता. जि. धाराशिव यांनी संगनमताने कट रचून इसम नामे लखन किसनराव सलगर यास तीव्र धारदार अज्ञात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून संपुर्ण डोक्यावरती, उजवे छातीवर, पाठीवर, वार करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवुन जीवे ठार मारले असल्याचे कबुल केले आहे. तरी सदर गुन्हयातील निष्पन्न झालेल्या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व यवत पोलीसांनी दि. ११/०७/२०२५ रोजी ताब्यात घेतले असून सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास हा वरिष्ठांचे आदेशान्वये सपोनि महेश माने हे करित आहेत.

सदरची कारवाई ही संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक, बागमती, बापुराव दडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड. यांचे मार्गदर्शनाखाली अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सपोनि गहूल गावडे (स्था.गु. शा), सपोनि महेश माने, सपोनि प्रविण संपांगे, पोलीस उपनिरीक्षक मागती मेतलयाड, महा. पो. फौजदार मचिन घाडगे (स्था.गु. शा), पो. हवा. मोमीन शेख (म्था.गु.शा), पो. हवा. अजित भुजबळ (स्था.गु. शा), पो. हवा. अजय घुले (स्था.गु.शाखा), पी. कॉ. बिरज जाधव (स्था.गु.शा), पो. हवा. संदीप देवकर, पो. हवा. गुरुनाथ गायकवाड, पो. हवा. अक्षय यादव, पो. हवा. विकास कापर, पो. हवा, दत्ता काळे, पो. हवा. महेंद्र चांदणे, पो. हवा. रामदास जगताप, पो. हवा. नारायण वलेकर, पो. हवा. गणेश कर्चे, पो. हवा. सुनिल नगरे, पो. हवा. विनायक हाके, पो. हवा. संतोष कदम, पो. हवा. प्रमोद गायकवाड, पो. हवा, परशुराम म्हस्के, पो. हवा. प्रमोद शिंदे, पो. हवा, वैभव भापकर, पो. कॉ. मारूती बागते, पो. कॉ. विनोद काळे, पो. कॉ. दिपक वेताळ, पो. कॉ. प्रणय ननवरे, पो. कॉ. प्रतिक गरूड, पो. कॉ. शुभम मुळे पो. कॉ. सचिन काळे, पो. कॉ. मोहन भानवमे, म.पो.कॉ. ग्वप्नाली टिळ्ये यांचे पथकाने केली आहे.



