आपला जिल्हा

News: राष्ट्रीय महामार्गामुळे जेजुरी करांवर एकतर्फी अन्याय; राष्ट्रीय दलीत पँथरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी शहरातून आळंदी पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 विकसित असून महामार्ग प्राधिकरणाने जेजुरी शहरातून जाणाऱ्या या रस्त्याच्या एकाच बाजूची जागा संपादन करण्याचा घाट घातला आहे. येथील नागरिकांवर हा एकतर्फी अन्याय असून शासनाने या कडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रीय दलीत पँथरच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय दलीत पँथरचे अध्यक्ष यशवंत नडगम यांनी दिला आहे.

आळंदी पंढरपूर महामार्ग क्रमांक 965 हा विकसित होत आहे. जेजुरी शहरातून हा राष्ट्रीय महामार्ग जाणून बुजन नेण्याचा घाट घातला गेला आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड आणि नीरा या शहरा बाहेरून बाह्यवळण विकसित होत आहे तर जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाचे तीर्थक्षेत्र आहे. वर्षाकाठी 50 लाखाहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने येथे सतत भाविकांची गर्दी असते. जेजुरी शहरा बाहेरून बाह्यवळण गरजेचे असताना शहरातून रस्ता विकसित केला जात आहे.

तसेच शहरातून हा रस्ता जाण्यासाठी मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला खुणा करण्यात आल्या प्रत्यक्षात मात्र केवळ उत्तरेकडील जागा भूसंपादन केली जाणार आहे. या बाबत न्याय मिळावा यासाठी अन्यायग्रस्त ग्रामस्थांनी राष्ट्रपती पासून तर स्थानिक नगरपालिका पर्यंत निवेदने देवून नागरिकांना न्याय मिळू शकला नाही.

या पार्शवभूमीवर राष्ट्रीय दलीत पँथरचे अध्यक्ष यशवंत नडगम यांनी जेजुरी येथे अन्यायग्रस्त नागरिकांशी चर्चा करून रस्त्याची पाहणी केली. याबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असून पुन्हा त्यांना विनंती निवेदन देणार आहे. जेजुरी कर अन्यायग्रस्त न्याय न मिळाल्यास राष्ट्रीय दलीत पँथरच्या वतीने उग्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

यावेळी पुणे जिल्हा दलीत पँथरचे अध्यक्ष जाफर सय्यद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button