क्राईम

Crime News: पोलीसांकडुन सराईत चोरट्यास अटक

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि.०९/०८/२०२६ रोजी घेवंडे, गावचे हद्दीत अॅड. सुरज ननवरे यांचे फॉर्म हाऊसचे बांधकाम चालु होते. त्या ठिकाणी बांधकाम साहित्य आणलेले होते. त्या साहित्यापैकी सुमारे अठठयांऐंशी हजार रूपयाचे साहित्य रात्रीचे वेळे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून चोरून नेहले होते. त्याबाबत पोलीस स्टेशनला घरफोडीसह चोरीचा गुन्हा कमांक ६६/२०२६ दाखल झालेला होतो.

त्याअनुषंघाने चोरट्यांचे शोधा करीता वेल्हे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी पोलीस स्टेशनकडील तपास पथक पोलीस उपनिरीक्षक देखमुख, पोलीस हवा. गजानन खत्री, सोमेश राऊत, पोलीस अमंलदार युवराज सोमवंशी, बुद्धीवान मोरे, अजिक्य बंडगर, आकाश पाटील, मयुर जगताप, अजय गांर्डी, शुभम कदम, सोमनाथ जाधव, असे पथक तयार केले होते. त्यांना चोरट्याचे शोधाबाबत व त्यांचे चोरी करण्याचे पद्धतीबाबत पथकास मार्गदर्शन करून योग्यत्या सुचना दिल्या होत्या. दिनांक १३/०८/२०१६ रोजी सांयकाळी ७:०० वाजता पथकातील पोलीस हवा. गजानन खत्री यांनी सदरचे नोरटे घेवंडे गावामध्ये पुन्हा चोरी करण्यान्ने उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे सदरचे पथक घेवंडे गावामध्ये पेट्रोलींग करीत असताना गावातील नागरीक सागर देवंगिरीकर, सराजुल अन्सारी, दिनानाथ प्रसाद, रामभाऊ जनकर, अनिकेत गायकवाड यांना पुन्हा फॉर्महाऊस जवळ एक पिकअप संशयीत रस्त्याने दोन-तीन वेळा चकरा मारत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांनी पिकअप टेम्पोवरील ड्रायव्हरला पिकअप थांबविण्यास कळविले असता तो न थांबता वेल्हे बाजुने पळुन जाऊ लागला. त्यामुळे त्याच भागात पेट्रोलींग करीत असलेल्या पोलीस स्टाफला माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी तो संशयीत पिकअप टेम्पो वरील नागरीकांचे मदतीने अडवला त्यावेळी डावे बाजुस बसलेले दोन चोरटे डोंगरात, झाडे-झुडपातुन पळुन गेले. परंतु पिकअप टेम्पो व त्यावरील ड्रायव्हर रमेश बबन मरगळे यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यास न्यायालयाचे समोर हजर करून सोमावार पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करून घेणेत आलेले आहे. तसेच त्याचेकडुन आज रोजी पर्यंत साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला असुन आणखिन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई संदीप गिल्ल, पोलीस अधीक्षक, डॉ. शुभम कुमार, अपर पोलीस अधीक्षक, सुनिलकुमार पुजारी, उपविभागीय अधिकारी हवेली विभाग, किशोर शेवते, सहा पोलीस निरीक्षक, वेल्हे पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देखमुख, पोलीस हवा. गजानन खत्री, सोमेश राऊत, पोलीस अमंलदार युवराज सोमवंशी, बुद्धीवान मोरे, अजिक्य बंडगर, आकाश पाटील, मयुर जगताप शुभम कदम, सोमनाथ जाधव यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button