News: ऑगस्ट महिन्यात शिबीर दौरा; 30 जुलैपासून अपॉइंटमेंट बुकिंग सुरू

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): प्रादेशिक परिवहन कार्यालच्यावतीने ऑगस्ट २०२६ महिन्यात भोर, सासवड, उरुळीकांचन, पिरंगुट, जेजुरी, शिक्रापूर आणि शिरूर या ठिकाणी १ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरांमध्ये पक्की अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणीसह विविध परिवहन विषयक कामकाजाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, जुलै २०२६ महिन्यात अपॉइंटमेंट (नियोजित वेळ) प्रणालीमध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या एनआयसीच्या माध्यमातून दुरुस्त करण्यात आल्या असून, ऑगस्ट महिन्यातील सर्व शिबीरांसाठीच्या अपॉइंटमेंटचे बुकिंग ३० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. शिबीराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी वेळेत अपॉइंटमेंट बुक करून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शिबीरस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.



