Crime News: जेजुरी एमआयडीसी मधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या दोघांना अटक

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी एमआयडीसी मधील आर्यन कंपनीतील तांब्याच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले असून आणखी तीन चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत. सदर गुन्ह्यातील संदीप पांडुरंग मेमाने (वय 36 वर्षे), शंकर अण्णा पवार (वय 34 वर्षे), दोघे रा. जेजुरी, ता. पुरंदर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जेजुरी औद्योगिक वसाहतीतील आर्यन कंपनीत 16 जून रोजी चोरट्यांनी तांब्याच्या तारा चोरून नेल्या होत्या. याबाबत जेजुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या माहिती नुसार पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचे आणखी तीन साथीदार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपीं कडून चोरीस गेले 14 किलो तांबे जप्त करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली Api उदार, IO राजेंद्र जाधव, ASI संतोष तोडकर, ASI नंदकुमार पिंगळे पोलीस हवालदार महेश खरात, विशाल भोरडे, अक्षय यादव, यांनी केली आहे. तांत्रिक विश्लेषणासाठी पोलीस हवालदार राजू मोमीन व अतुल डेरे यांचे सहकार्य मिळाले.



