क्राईम

Crime News: जेजुरीत भंडारा–खोबरे दुकानाची तोडफोड करून दुकानदारास मारहाण; अज्ञात ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : तीर्थक्षेत्र जेजुरी येथील नंदी चौक परिसरात भंडारा–खोबरे दुकानासमोर झालेल्या वादातून अज्ञात ५ ते ६ जणांनी दुकानाची तोडफोड करून दुकानदारास लाकडी बांबूने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि. ३१) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली असून याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात फर्यादी महादेव श्रीरंग वाघमारे (वय 35 वर्षे) रा. जेजुरी यांनी आरोपी अज्ञात 5 ते 6 जणांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या दुकानासमोर चप्पल काढू नका, असे सांगितल्याचा राग मनात धरून अज्ञात इसमांनी शिवीगाळ करत “जागा काय तुझ्या बापाची आहे का, हा रस्ता आहे,” असे म्हणत दुकानासमोरील व आजूबाजूला पडलेले लाकडी बांबू हातात घेऊन दुकानाची तोडफोड केली. तसेच भंडारा–खोबरेचे भरलेले भांडे व पेढे पायाने व हाताने फेकून देत नुकसान केले.

यानंतर आरोपींनी दुकानात घुसून फिर्यादीस लाकडी बांबूने जोरजोरात मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्यावर, पाठीवर, हात व पायावर दुखापत झाली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), १८९, १९०, १९१, ३५१(२), ३५१(३), ३५२, ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पिंगळे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button