आपला जिल्हा
News: जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण केंद्राची स्थापना

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जिल्ह्यातील १४ नगरपरिषद व ३ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या तक्रार निवारणबाबत केंद्राचा ०२०-२६०६१७०५ दूरध्वनी क्रमांक आहे. संबंधितांनी या क्रमांकावर संपर्क साधून निवडणुकीसंदर्भातील आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन नगरपालिका प्रशासन शाखेच्या प्र. जिल्हा सह आयुक्त ॲलिस पोरे यांनी केले आहे.


