आपला जिल्हा

News: जेजुरी येथे ‘Maddy’s Mission’ मित्र परिवाराकडून 1 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जेजुरी येथे 1 नोव्हेंबर 2025 रोजी जानाई मंदिर,जेजुरी याठिकाणी सकाळी 8 ते सायंकाळी 6 यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून यामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हा बोध लक्षात घेऊन दरवर्षी मधु च्या वाढदिवसादिवशी म्हणजेच 1 नोव्हेंबरला कर्वेनगर, धनकवडी, हडपसर, चिंचवड , जेजुरी, कोल्हापूर या ठिकाणी रक्तदानाचे आयोजन केले जाते. आपल्या शरीरातील रक्ताची प्रत्येकाला स्वतः ला गरज असून आपण रक्तदान करतो ते अनोळखी गरजू लोकांचा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडते म्हणून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानासारख्या पुण्यकर्मात सहभागी व्हा. तुमचा सहभाग कोणाचं तरी जीव वाचवण्याच्या कार्यात हातभार लावत आहेत. पर्यायाने रक्तदानचे फायदे स्वतःसाठी देखील आहेतच.

रक्तदान म्हणजे केवळ गरजूंना मदत करणे नव्हे तर रक्तदात्याच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरणारी एक पद्धत आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की दर सहा महिन्यांनी किमान एकदा रक्तदान करणे आपल्यासाठी आरोग्यदायी आहे. म्हणूनच रक्तदानाबद्दल जागरूकता आणि संधी निर्माण करण्यासाठी रक्तदानाविषयी परस्परसंवादी जागरूकता आयोजित केली पाहिजे.

नियमित रक्तदान करणे आपल्या शरीरासाठी अतिशय चांगले आहे. त्याचे काही फायदे :

1) ज्या रुग्णांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यांच्यामध्ये रक्तदान विषारी पदार्थांचे संचय रोखते.

2) रक्तदान केल्याने पुरुषांमध्ये हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो.

3) एका रक्तदानामुळे तीन जणांचे प्राण वाचू शकतात.

4) रक्तदान केल्याने केवळ रक्तपेशी घेतलेल्या व्यक्तीलाच फायदा होऊ शकत नाही तर रक्तदात्याचे आरोग्य देखील सुधारू शकते.

5) रक्तदान केल्याने अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात आणि तुमचे कोलेस्टेरॉल कमी होते.

6) रक्तदान केल्यानंतर, आपल्या शरीरात रक्तपेशींची संख्या कमी होते, ज्यामुळे अस्थिमज्जा नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यास उत्तेजित होते जेणेकरून ती कमतरता भरून निघेल. म्हणून, ते नवीन रक्तपेशींच्या निर्मितीला उत्तेजन देते आणि शरीरातील रक्त प्रणालीला ताजेतवाने करते.

7) एकदा रक्तदान केले की ३५० मिली मधुन ५० मिली प्लेटलेट्स बाजूला काढता येतात. याचा रूग्णाला फायदा होतो.

8) रक्तदान हेच सर्वात मोठे दानशूरपणाचे लक्षण आहे.

१ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी व्हा . तुमच्या पूर्ण दिवसापैकी अर्ध्या तासाचा वेळ नक्की राखून ठेवा . आम्ही आपली वाट पाहत आहोत . हडपसर, जेजुरी, कर्वेनगर, चिंचवड आणि धनकवडी या पुण्यातील विविध भागात आपल्या सोयीनुसार आपण नक्की रक्तदान करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button