आपला जिल्हा
News: जेजुरी पोलीस स्टेशनकडून आगामी गणेश उत्सव, गौरी पूजन व ईद-ए-मिलाद या सणांच्या अनुषंगाने रूट मार्च

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरीत आज दि. 26/08/2025 रोजी, सकाळी 11:00 वा जेजुरी पोलीस स्टेशनला आगामी गणेश उत्सव, गौरी पूजन व ईद-ए-मिलाद या सणांच्या अनुषंगाने जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा या अनुषंगाने जेजुरी पोलीस स्टेशन – मोरगाव चौक – जाम मस्जिद- उभीपेठ -नंदी चौक -जानुबाई आळी-ईदगाह मैदान – छत्रपती शिवाजी महाराज चौक – जुने पालखी मैदान असा रूट मार्च घेण्यात आला.

सदर रूट मार्च व मॉब डिस्पोजल सरावाकरिता जेजुरी पोलीस स्टेशनचे कडील एकूण 1 सपोनि, 3 पो.स.ई. अधिकारी, अंमलदार – 20 , सासवड होमगार्ड पथकाचे- 18 होमगार्ड जुना पालखी मैदान जेजुरी येथे उपस्थित होते.



