आपला जिल्हा

News: जेजुरीत पाच मजली इमारत झुकली; अग्निशमन दल व पोलिसांची तातडीची धाव, रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : जेजुरी येथे खोमणे आळी परिसरात आज दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 5.30 वाजता बांधकाम सुरू असलेली पाच मजली इमारत अचानक एका बाजूला धोकादायकरीत्या झुकल्याने परिसरात खळबळ उडाली. वेळीच घेतलेल्या उपाय योजनांमुळे संभाव्य अनर्थ टळल्याचे मानले जात आहे.


या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन इमारती भोवतालचा परिसर तात्काळ बंद करण्यात आला तसेच शेजारील रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, इमारत झुकण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पथक कार्यरत असून, नेमके कारण तपास अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या शहरांमध्ये बांधकामादरम्यान सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button