महाराष्ट्रशैक्षणिक
News: शिक्षक भरती परीक्षेचे प्रवेशपत्र वेबलिंकद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा मंगळवार दिनांक २७ मे पासून आयोजित करण्यात आली असून आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्राची वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.

शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (टीएआयटी) – २०२५ परीक्षा २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली असल्याचेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.
