क्राईम

Crime News: एक वर्षापासुन फरार आरोपीस पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ६१/२०२५ बिएनएस कलम ११८(२) व इतर प्रमाणे गुन्हा दाखल असुन लग्नात झालेल्या भांडणाचे कारणावरून झालेल्या वादातुन बेकायदा गर्दी जमाव जमवुन मारहाण करून जखमी केले असलेबाबत फिर्याद नोंदविलेली होती.

गुन्हयातील इतर आरोपी यांना यापुर्वीच अटक करण्यात आलेली असुन यातील फरार आरोपी विश्वनाथ धोंडीबा ढेबे, (वय २१ वर्षे), रा. पोळेकर वस्ती, डोणजे, ता. हवेली, जि.पुणे हा गेले ०१ वर्षापासुन फरार होता. त्याचे अस्तित्वाबद्दल कोणतिही माहिती प्राप्त होत नव्हती पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या पोलीस स्टेशन मधील पाहिजे फरार आरोपी शोध घेणेकामी स्वतंत्र पथक नेमुण आरोपी अटक करणेबाबत प्राप्त सुचनेनुसार पोलीस स्टेशन कडील पथकातील पोहवा/२४७८ सोमेश राउत यांना नेमण्यात आले त्यांनी प्राप्त गोपणीय माहितीच्या आधारे पुणे शहरातील डोणजे, नांदेड सिटी, हवेली परीसरात शोध घेवुन गोपणीय माहितीच्या आधारे माहिती घेवुन आरोपीस रात्री ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी केली असता त्याचेवर यापुर्वी हवेली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेबाबत माहिती सांगत आहे.

आरोपी विश्वनाथ धोंडीबा ढेबे, (वय २१ वर्षे), रा. पोळेकर वस्ती, डोणजे, ता. हवेली, जि.पुणे यास ताब्यात घेवुन वेल्हे पोलीस स्टेशन येथे घेवुन आलेनंतर आरोपीस विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने गुन्हा केला असल्याचे निष्पण्ण झाले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक, संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक, रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक, किशोर शेवते, पोहवा/२४७८ सोमेश राउत, पोशि राजेद्र आवदे, पोशि मयुर जगताप व पोलीस स्टेशनकडील स्टाफ यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button