Crime News: जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत एम.आय.डी.सीत चोरी करणारे गजाआड

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत एम.आय.डी.सीत चोरी करणारे आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फिर्यादी गोपाळ बुलाकीदास लढढा (वय 67 वर्षे) रा. जेजुरी विदयानगर ता. पुरंदर जि. पुणे यांनी त्याचे अलोक इंड्रस्टीज प्लाट न. सी4/25 एम.आय. डी.सी जेजुरी या कपंनीतील एकुण 15,80,515/- रू किमतीचे अलोय स्टील बारग्रेट 34 सी.आर.एन.आय.एम ओ 6 डाया मीटर 45 चे वेगवेगळे प्रकारचे बार कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करून चोरून नेलेबाबत जेजुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेवरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.न. 180/2025 बी.एन.एस 303 (2), 3 (5) अन्वये दिनाक 16/5/2025 रोजी गुन्हा नोद करणेत आला होता.

सदर गुन्हा दाखल होताच तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी भेट देवुन सदर ठिकाणी असणारे सी.सी.टी.व्ही. फुटेजचे आधारे व गोपनीय बातमीदारांचे आधारे इसम नामे 1) ज्ञानेश्वर मिनीनाथ कांबळे रा. बारसोडेनगर जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे आधारे चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केलेची कबुली दिली व त्याचेसोबत त्याचे साथीदार 2) राहुल संतोष वाघरी रा.जुनी जेजुरी ता. पुरंदर जि. पुणे 3) रूषभ राम चव्हाण रा. जेजुरी ता. पुरंदर जि.पुणे 4) अमित सुरेश वाघरी रा.जुनी जेजुरी ता. पुरंदर जि.पुणे 5) पवन जगन्नाथ पोतदार रा. खोमणेआळी जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे हे असल्याचे सांगितलेने त्यांनाही तपासकामी ताब्यात घेणेत आले असुन, नमुद सर्व आरोपीत यांना गुन्हयाचे कामी अटक करून त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी कोर्ट सासवड याचे न्यायालयात हजर करून त्यांची अदयापर्यन्त 9 दिवस पोलीस कोठडी रिमांड घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने तपास करून त्याचेकडुन अदयापपर्यन्त 8,95,685/- रू. किमतीचे अलोय स्टील बारग्रेट 34 सी.आर.एन.आय.एम ओ 6 डाया मीटर 45, 46 चे बार हस्तगत करणेत आले आहेत. तसेच गुन्हयात वापरलेली एक 3,00,000/- रू किमतीचे छोटा हत्ती चार चाकी वाहन, 60,000/- रू किमतीची एक दुचाकी मोटारसायकल हस्तगत करणेत आली आहे. सदर आरोपीत याचेकडुन गुन्हयातील उर्वरित मुदेमाल हस्तगत करणेकामी तपास सुरू आहे. तसेच नमुद आरोपीत यांनी आणखीन काही गुन्हे केले आहेत का, याबाबत तपास सुरू आहे. जेजुरी पोलीस स्टेशन कडुन एम.आय.डी.सी भागात आणखीन कोणाची चोरी झाली असलेस त्यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला येवुन तक्रार देणेबाबत आवाहन करणेत येत आहे.

सदर कारवाई संदीपसिह गिल, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिराजदार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग बारामती, तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड, दिपक वाकचौरे, सहायक पोलीस निरीक्षक, जेजुरी पोलीस स्टेशन, दशरथ बनसोडे पो. हवा.ब.न 1418, संदीप भापकर पो.हवा.ब.न 2404, विनोद देशमुख पो.हवा.ब.न 2093 याचे पथकाने केली असुन, सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हवालदार दशरथ बनसोडे हे करीत आहे.