Crime News: जेजुरी: बंद घराचा कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 1,67,000/- रु. चा ऐवज लंपास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पत्रावस्ती टेकवडी ता. पुरंदर, जि. पुणे येथे अज्ञात चोरट्याने घराचा कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे 1,67,000/- रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत फिर्यादी निलेश संपत इंदलकर (वय 35 वर्षे) यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला आरोपी अज्ञात चोरटा यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 22/05/2025 रोजी संध्याकाळी 06:00 वाजताचे सुमारास ते दि. 23/05/2025 रोजी रात्री 12:30 वा.चे दरम्यान मौजे पत्रावस्ती टेकवडी ता. पुरंदर, जि. पुणे येथे आमचे बंद घराचा कोयंडा तोडुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने आमचे घरातील कपाटातील 39 ग्रँम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 50,000/- रूपये असा एकुण 1,67,000/- रूपये किंमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला आहे म्हणुन माझी त्या अज्ञात चोरटया विरूध्द कायदेशीर फिर्याद आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 190/2025 भारतीय न्याय संहीता कलम 2023चे कलम- 305(a), 331(3), 331(4) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो स ई तारडे हे करत आहेत.