क्राईम
Crime News: जेजुरी: अहिल्यादेवी तलावात आढळला अनोळखी पुरूष मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज) : दि. २०/०५/२०१५ रोजी जेजुरी येथील अहिल्यादेवी तलावाचे पाण्यात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे 35 ते 40 वर्षे मिळून आले आहे.

सदरच्या मयताचे वर्णन- सडपातळ-बांधा, ऊंची-165 सेमी, रंग-निमगोरा उजव्या हाताच्या पोटरीवर “दिगंबर” असे लिहिलेले गोंधलेले. उजवे हाताच्या अंगठ्याच्या वर “आई” असे गोंधलेले. अंगात फक्त कार्य रंगाची अंडरवेअर आहे, बाकी कपडे नाहीत. डोकीस काळी केस-दाढी वाढलेली काळी. सदरचे प्रेत अहिल्यादेवी तलावात तरंगत असताना आढळून आले आहे. बहुतेक सदर इसम पोहण्यासाठी आला असावा.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा/४१४ नंदकुमार पिंगळे हे करीत आहेत.