क्राईम

Crime News: बनावट अश्लील व्हिडिओ बनवून खंडणी मागणारे खंडणीखोर जेजुरी पोलीसांनी केले अटक; जेजुरी पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील तक्रारदार रामदास आण्णा खेरे रा. खैरेवाडी ता. पुरंदर, जि. पूणे यांनी तक्रार दिली की आरोपी संदीप विठ्ठल चिकणे रा. चिकणेवाडी नाझरे क.प. ता. पुरंदर, जि. पुणे याने सन २०२१ मधे फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याची भिती दाखवुन २५ लाख रुपये फिर्यादी कडून घेतले आहेत व दि. १२/०५/२०२४ रोजी संदीप चिकणे याने फिर्यादी यांचा जमीन खरीदी विक्रीचा व्यवसाय व दुग्धव्यवसाय निट करावयाचा असेल तर त्याला ५० लाख रुपये द्यावं लागतील असे म्हणून फिर्यादीकडून ५० लाख रुपयांची मागणी केली आहे व पैसे दिले नाही तर मला जिवे ठार मारण्याची भीती दाखवली आहे.

तसेच एका महिलेचा अश्लील पोनोग्राफीक स्वरुपातील बनावट व्हिडीओ तयार करून तो व्हिडिओ व्हायरल करणेची धमकी दाखवून फिर्यादीकडे ५० लाख रुपयेची मागणी केली आहे तसेच भागातील प्रतिष्ठीत लोकांनाक लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून त्याचेकडूनही मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेचे फिर्यादी याना समजले आहे. तरी फिर्यादी त्याचे कुटुंबाचे जिवास संदीप विठ्ठल चिकणे, रा. चिकणेवाडी नाझरे कप ता. पुरंदर, जि. पुणे याचेपासून धोका आहे बगैर मजकरू, खबरीवरून जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करणेत आला आहे.

सदर गुन्हाचे तपासकामी 1) संदीप विठ्ठल चिकणे (वय 47 वर्षे), रा. चिकनेवाडी नाझरे क. प. ता. पुरंदर जिल्हा पुणे

२) प्रविण नानासो गोरे (वय 22 वर्ष) रा. खेरवाडी नाझरे कप ता. पुरंदर, जि. पुणे यांना दि. ३१/०५/२०२४ रोजी अटक केले आहे तसेच मा. न्यायालयाने सदर आरोपीत यांना ४ दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.

अशा प्रकारे बनावट अश्लील व्हीडीओ तयार करुन, तसेच कोणत्याही प्रकरणात तडजोड करणेकामी बेकायदेशीरपणे कोणी खंडणीखोर सामान्य जनतेकडे आधीक मागणी करत असेलव कोणाची पिळवणुक करत असेल हनी ट्रैप करुन पैसे मागत असेल तर जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करणेबाबत दीपक वाकचौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करणेचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button