News: पुरंदर विधानसभा निवडणुकीत इतके टक्के झाले मतदान

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५२.०५ टक्के मतदान झाले. सकाळी वेगात मतदान झाले तर दुपारी मतदान वेग मंदावला असला तरी सायंकाळी ४ ते ६ दरम्यान मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला.

पुरंदर विधानसभा निवडणुकीत १६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत ४.२८ टक्के, अकरा वाजेपर्यंत १४.४ टक्के, एक वाजेपर्यंत २७.३५ टक्के, तीन वाजेपर्यंत ४०.३२ टक्के, तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५२.०५ टक्के मतदान झाल्याची माहिती पुरंदरच्या निवडणूक अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.

पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी २ लाख ४० हजार ५३८ पुरुष मतदार, २ लाख २३ हजार ४४६ महिला मतदार तर ३३अन्य असे एकुण ४ लाख ६४ हजार १७ मतदारांची नोंद होती. त्यापैकी पाच वाजेपर्यंत १ लाख २८ हजार ३३९ पुरुषांनी, १ लाख १७ हजार ६६८ महिला, तर २ अन्य असे एकुण २ लाख ४६ हजार ००९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.