आपला जिल्हानिवडणूक

News: मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आवारात मोबाईल नेण्यास प्रतिबंध

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक वगळता उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदार आदींना मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५६४ मतदान केंद्रे असून मतदारसंघात ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार आहेत. यामध्ये ३ लाख ४८ हजार ४५० पुरुष, ३ लाख १५ हजार ११५ महिला, तर ५७ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर छायाचित्रीकरण करण्यास बंदी असून मोबाईल, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, वायरलेस सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई आहे.

मतदानाच्या दिवशी अनावधानाने एखाद्या मतदाराने मतदान करण्यासाठी मोबाईल सोबत आणल्यास तो मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरावर ठेवावा लागेल. सर्व उमेदवार आणि मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button