आपला जिल्हानिवडणूक

जेजुरी: पुरंदर विधानसभा मतदार संघात कोणाच्या नावाची चर्चा; मतदार अजूनही संभ्रमात

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुरंदर विधानसभेत प्रचाराची रणधुमाळीने वेग पकडला असून, उमेदवारांकडून जोरादार प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. विधानसभा निवडणुकीला अवघा आठवडा बाकी राहिलेला आहे.

पुरंदर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात १६ उमेदवार असले, तरी मुख्य लढत ही विजय शिवतारे, संजय जगताप, आणि संभाजी झेंडे अशी होणार असल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीच्या काळात ज्यावेळी युतीकडून विजय शिवतारे (शिंदे पक्ष) आणि संभाजीराव झेंडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष) यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी मैत्रीपूर्ण लढत होईल, असे सांगितले गेले. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता चित्र पूर्णपणे वेगळे आहे.

आघाडीचे संजय जगताप, युतीचे दोन उमेदवार अनुक्रमे विजय शिवतारे आणि संभाजीराव झेंडे या तिन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. यामुळे कोणाचे पारडे जड आहे, असे निश्चित सांगता येणार नाही. कुठे जगताप यांना पसंती, कुठे शिवतारे यांच्या नावाची चर्चा, तर कुठे नवा चेहरा म्हणून संभाजीराव झेंडे यांच्याकडे पाहिले जात आहे. यामुळे कुण्या एका उमेदवाराला पसंती न देता संदिग्ध स्वरुपाची प्रतिक्रिया या विधानसभेतील मतदार देत आहे.

नुकताच युतीकडून रिंगणात असलेले विजय शिवतारे यांना भाजपचा पाठिंबा देण्यात आला आहे. तर भाजपचे गंगाराम जगदाळे यांनी संभाजीराव झेंडे यांना पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे काहीजण शिवतारे यांच्या सोबतीला आहेत, तर काहीजण झेंडे यांच्यासोबत जात आहेत. तसेच युतीकडून दोन उमेदवार असल्याने कोणाच्या बाजूने उभे राहिचे, असा प्रश्ना कार्यकर्त्यांना पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button