Crime News: मंदीर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद, 11 मंदीर चोरी गुन्हयांची उकल करून 4,00,000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे जिल्हयातील आंबेगाव, शिरूर, शिक्रापुर, रांजणगाव, खेड भागात मागील काही दिवसापासून मंदिर चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलास मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याचे व प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते.
पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे गु.र.नं. ११४/२०२४ भा.न्या.सं. २०२३ कलम ३३१ (४), ३०५(३) सदर गुन्हयाचा तपास चालू असताना पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे तपास पथक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पो.हवा. अमोल वडेकर, पो.कॉ. संजय साळवे व पो.कॉ. मंगेश अभंग हे सदर गुन्हयाचा तपास करीत असताना गेले काही महिन्यापासून वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीत जावुन मंदीर चोरीच्या गुन्हयांचे अनुषंगाने सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करीत असताना एक संशईत इसम चोरी करत असल्याचे आढळून आले. सदर इसमाबाबत तांत्रिक दृष्टया तपास करून गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, सी.सी.टी.व्ही. मधील इसम हा विनायक दामू जिते हा आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची खात्री पारगाव (कारखाना) पोलीसांना झाली. सदर इसम हा शिक्रापुर येथे येणार असल्याची गोपनीय माहीती मिळाली असता त्यास सापळा रचून शिताफिने पो. कॉ. संजय साळवे व पो.कॉ. मंगेश अभंग यांनी शिकापूर येथून ताब्यात घेवुन त्यास मंदिर चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवुन तपास केला असता त्याने मंदिर चोरीची कबुली दिली त्यामुळे आरोपी नामे विनायक दामू जिते रा. कान्हूर मेसाई ता. शिरूर जि.पुणे यांस वरील गुन्हयाचे अनुषंगाने दि. ३१/०७/२०२४ रोजी अटक केली. तो पोलीस कस्टडीमध्ये असताना मंदिर चोरी बाबत त्याचेकडे अधिक विचारपुर केली असता त्याने शिंगवे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, लाखणगाव येथील देवीचे मंदीर, मांदळेवाडी येथील हनुमान मंदीर, जारकरवाडी येथील बोल्हाई मातेचे मंदीर, असे पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याचे सांगीतले. त्यास आणखी विचारपुस करून तपास केला असता त्याने शिक्रापुर येथील राउतवाडी येथील श्रीनाथ मस्कोबा मंदीर, शिक्रापूर येथील कवटेमळा येथील वडजाई माता मंदिर, खेड राजगुरूनगर येथील कन्हेरसर येमाई जुने ठाणे मंदिर, शिरूर सविंदणे येथील काळूबाई मंदीर, रांजणगाव फंडवस्ती येथील तुकाई माता देवीचे मंदिर, घोडेगाव शिंदेवाडी येथील खंडोबा मंदीर व कळंमजाई मंदीर, तसेच अहमदनगर जिल्हयातील सुपा येथील तुकाई मंदीर वाडेगव्हाण पारनेर व नगर एम.आय.डी.सी. येथील श्री. खंडोबा मंदिर शिव मल्हारगड पिंपळगाव माळी इत्यादी ठिकाणी रात्रीच्या वेळी मंदिर चोऱ्या केल्या असल्याचे सांगीतले आहे.

सदर गुन्हयांच्या अनुषंगाने तपास करून गेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे. तो खालील प्रमाणे.
1) पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे G.R.No. 114/2024 I.J. क्र. 2023 दंड 331 (4), 305 (अ)
हस्तगत माल- रु. 32,000/- रोख रक्कम आणि भाविकानी दानपेटीत दिलेली रोख रक्कम
२) पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे गु.र.नं. १२१/२०२४ भा.द.वि. कलम ४५७, ३८०
हस्तगत माल – १) ४ सोन्याचे मणी व २ सोन्याच्या वाटया वजन ३ ग्रॅम अंदाजे २) एक सोन्याची नथ वजन अर्धा ग्रॅम
3) घोडेगाव पोलीस ठाणे G.R.N. 141/2024 I.D.V. पेन 457, 380
हस्तगत माल- 2 समई, आहुजा कंपनीला आग.
4) खेड पोलीस ठाणे G.R.No. ४५२/२०२४ I.J. क्र. २०२३ पेन ३३१(४), ३०५(अ)
हस्तगत माल – देवीचा मुखवटा
५) शिरूर पोलीस ठाणे गु.र.नं. ६५२/२०२४ भा.न्या.सं. ३३१ (४), ३०५(३)
हस्तगत माल – अहुजा कंपनीचे अॅम्प्ली फायर, सोन्याच्या दोन वाट्या, चार मणी वजन ३ ग्रॅम अंदाजे.
६) शिकापूर पोलीस ठाणे गु.र.नं. ६८६/२०२४ भा.न्या.सं. ३३१(४), ३०५(३)
हस्तगत माल – अर्धा किलो वजनाचा चांदीचा देवीचा मुखवटा, अहुजा कंपनीचा अॅम्प्ली फायर, २ समई, २ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसुत्र
७) रांजणगाव पोलीस ठाणे गु.र.नं. ३१२/२०२४ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८०
हस्तगत माल – १) २ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या वाटया २) २ ग्रॅम वजनाचे २ डुल ३) दिड ग्रॅम वजनाची सोन्याची नथ
८) सुपा पोलीस ठाणे गु.र.नं. २०५/२०२४ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८०
हस्तगत माल – १) एक सोन्याची नथ दिड ग्रॅम वजनाची २) दोन सोन्याच्या वाटया २ ग्रॅम वजनाच्या, चार सोन्याचे मणी १ ग्रॅम वजनाचे.
9) नगर M.I.D.C. पिंपळगाव माळवी G.R.N. 267/2024 I.D.V. पेन 457, 380
हस्तगत माल – 7 किलो वजनाची पितळी घंटा, आहुजा कंपनीचे ॲम्प्लीफायर
10) शिकापूर पोलीस ठाणे G.R.N. 604/2024 I.D.V. पेन 457, 380
हस्तगत माल – २ समई, चांदीचे दोन घोडे, व एक चांदीचा नंदी.
११) पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे गु.र.नं. १२२/२०२४ भा.न्या.सं. २०२३ कलम ३३१ (४), ३०५(३)
हस्तगत माल – २ सोन्याच्या वाटया, ४ सोन्याचे मणी, २ सोन्याच्या रिंगा, ४ पितळी समई, आहुजा कंपनीचा अॅम्पली फायर
असे एकुण १,६३,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिने, १,१७,०००/- रु किंमतीचे चांदी मुखवटे व पितळी धातूच्या वस्तु, ८०,०००/- रु व किंमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य व ३२०००/- रु कॅश.
सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग अमोल मांडवे, पो.नि. अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे, भाऊसाहेब लोकरे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार अमोल वडेकर, अविनाश कालेकर, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित मडके, पो.ना.शांताराम सांगडे, रमेश इचके, पो.कॉ. संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, नवनाथ राक्षे, गजानन डाके, ओमनाथ तुमकुटे, राजेश उतळे, सर्व पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे व पो.हवा. विकम तापकीर, पो.कॉ. निलेश सुपेकर, मंगेश थिगळे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, लाखणगाव पोलीस पाटील कल्पना बोन्हाडे यांनी केली आहे.