आपला जिल्हा
News: जेजुरी: गणेशोत्सव व ईद ए मिलाद अनुषंगाने जेजुरी पोलीस स्टेशनकडून रूट मार्च

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): गणेशोत्सव सन २०२४ व ईद ए मिलाद सन २०२४ अनुषंगाने जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहावी या कारणास्तव आज दि.१३/०९/२०२४ रोजी सायंकाळी ५:३० ते ६:१५ दरम्यान जेजुरी पोलीस स्टेशन येथुन रूट मार्च काढत मोरगाव चौक – छ. शिवाजी महाराज चौक जुने पालखी मैदान जेजुरी येथे जावुन दंगा काबु योजना राबविण्यात आली.

सदर दंगा काबु योजना वेळी जेजुरी नगरपरिषद आग्निशामक बंब, महावितरण कर्मचारी, वैदयकीय अधिकारी, स्टफ व रूग्णवहीका तसेच जेजुरी पोलीस स्टेशन कडील प्रभारी अधिकारी दिपक वाकचौरे, पोसई तारडे, पोसई पुजारी, मपोसई पवार, जेजुरी पोलीस स्टेशनकडील १५ पोलीस अंमलदार, ६ होमगार्ड व राज्य राखीव बल गट क्र. १ यांचेकडील १ प्लाटुन उपस्थित होते.


