आपला जिल्हा

News: विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीचे सोमवारी आयोजन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीत सभागृह क्र.१ येथे आयोजित करण्यात आली असल्याचे महसूल उप आयुक्त आण्णासाहेब चव्हाण यांनी कळविले आहे.

प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन झाल्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो, असेही चव्हाण यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button