Crime News: जेजुरी पोलिसांकडून मटका जुगार अड्ड्यांवर छापेमारी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत चालणाऱ्या बेकायदेशीर मटका जुगार अड्ड्यांवर छापेमारी करून कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदेशीर चालणाऱ्या मटका जुगार अड्ड्यांवर छापेमारी करून 5 आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर छापेमारीत 12545/- रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी सरकार तर्फे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार विलास श्रीपती गजाकस (वय ६३ वर्षे), रा. जुनी जेजुरी, संजय सिताराम भोसले (वय ५३ वर्षे), रा. शिवाजी चौक, जेजुरी) आणि सचिन अंकुश बोडरे (वय ३७ वर्षे), रा. सासवड, ता. पुरंदर, परशुराम गंगाराम खोमणे (वय ३२ वर्षे) रा. मावडी क.प., ता. पुरंदर, जि. पुणे, लक्ष्मण तात्याबा गायकवाड (वय 37 वर्षे) रा. जेजुरी रेल्वे स्टेशन, ता. पुरंदर, जि. पुणे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा (रजि. नं. १५९/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.


