Crime News: जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर धडाकेबाज कारवाया

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशनचा कार्यभार दिपक वाकचौरे, सहा पोलीस निरीक्षक यांनी घेतलंपासुन, नव निर्वाचिन पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण याचे मार्गदर्शनाखाली व संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग बारामती याचे व उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांचे सुचनावरून जेजुरी पोलीस स्टेशन हदीत असणारी महत्वाची गावे जवळाअर्जुन, जेजुरी, पिंपरे व सिमलेस कंपनी परीसरात निरा, जेऊर या परीसरात चालणारे अवैध दारू धंदे, अवैध गावठी हातभटया, जुगार, मटका तसेच बेलसर गावचे हदीत चालणारा अवैध वैश्याव्यवसाय, यावर धडाकेबाज कारवाया करून एकूण २,७६०००/- रु. मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.
दिनांक ६/२/२०२४ रोजी सिमलेस कंपनीसमोर झाडीमध्ये चालु असलेल्या अवैध हातभटी व्यवसायाकारतो छापा टाकुन त्या ठिकाणाहुन २,०१,०००/- रू. किमतीचा प्रोव्हीयीशन माल हस्तगत करून गु.र.न ४५/२४ भादवि ३२८ प्रमाणे गुन्हा नोद करून आरोपी पृथ्वी अंकुश राठोड यास अटक करून कारवाई करणेत आली आहे. दिनांक ७/२/२०२४ रोजी जवळाअर्जुन गावचे हदीत गावठी तयार दारू व्यवसायाकरीता कारवाई करून त्या ठिकाणावरून १२००/- रू. किमतीचा प्रोव्हीबीशन माल जप्त करून गुरन ४७/२४ कलम ६५ ई प्रमाणे कारवाई करून गुन्हयातील आरोपी यास अटक करणेत आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहा फौजदार लोंढे हे करीत आहेत.

दिनांक ८/२/२०२४ रोजी पेशवे तलावाशेजारी अवैध दारू विकी व्यवसाय करणारेवर कारवाई करून त्याचेकडून ८००/- रू किमतीचा प्रोव्हीबीशन माल हस्तगत करून गु.र.न ५१/२४ कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा नोद करून आरोपी संदीप केज राठोड यास अटक करून कारवाई करणेत आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा हाके हे करीत आहे.
दिनांक ९/२/२०२४ रोजी जेऊर गावचे हदीन अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करून त्यानेकडून ७५०/- रु प्रोव्हीबीशन माल हस्तगत करणेत आला असुन, त्यावरून जेजुरी पो.स्टे गुरन ५३/२०२४ कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन आरोपी दादा पांडुरंग जाधव रा. जेऊर ता. पुरंदर, जि.पुणे यास गुन्हयाचे अटक करून कारवाई करणेत आली आहे. पुढील तपास पो.ना.करे हे करीत आहे.
दिनांक ६/२/२०२३ रोजी पिंपरे खु।। गावचे हदीत जुगार खेळणारे इसमावर कारवाई करून त्यानेकडून २२५०/- रू मुदेमाल हस्तगत करणेत आला असुन, केले कारवाईवरून जेजुरी पोलीस स्टेशन गुरन ४४/२०२४ मू. जुकाक १२अ अन्वये गुन्हा नोद करणेत आला असुन मिळुन आलेले एकुण ५ आरोपींना अटक करून त्याचेवर कारवाई करणेत आली आहे. मौजे बेलसर गावचे हदीत हॉटेल लक्ष्मीनारायण या लॉजवर वैश्याव्यवसाय चालु असले बाबतची माहीती मिळालेने सदर ठिकाणी अचानक छापा टाकुन सदर ठिकाणाहुन ३ पिडीत महीलेची सुटका करणेत आली असुन, त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.न. ५२/२०२४ अनैतिक मानवी व्यापार प्रनिबंध कायदा कलम ३,४,५ व भादवि ३७० प्रमाणे गुन्हा नोद करून गुन्हयातील आरोपी १) रविश केशव देशभंडारी (वय २८ वर्षे) सध्या रा. लक्ष्मीनारायण लॉजिग अॅन्ड बोडींग रेस्टॉरंट तकारवाडी ता. पुरंदर, जि. पुणे २) प्रथमेश रामचंद्र जावळे (वय २५ वर्षे) रा. खडकी देवळा ता. वडवणी जि बीड यांना अटक करणेत आली आहे. व प्रभावी कारवाई करणेत आली आहे.
तसेच जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.न ६५७/२०२३ भागवि ३७९ या ताखल गुन्हयामध्ये दोन गायी चोरीस गेलेल्या होत्या. सदर गाय चोरीच्या अनुशंगाने फलटण, बारामती, तांदुळवाडी या भागातील ३ आरोपीन यांना ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी करून त्याचेकडुन एक गाई जप्त करणेत आली आहे. व आणखीन उर्वरित गाईंचा शोध अदयाप चालु असुन गुन्हयाचा तपास पो. हवा. खाडे हे करीत आहेत.
यापुढे जेजुरी पोलीस स्टेशन हदीत अवैध धंदयावर याप्रमाणेच प्रभावी कारवाई करून अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन केले जाईल त्याबाबत नागरिकांना अवैधधंदयाबाबत काही माहीती प्राप्त झालेस तात्काळ जेजुरी पोलीस स्टेशनशी सपर्क करावा.