आपला जिल्हा

News: पुणे जिल्ह्यातील 1574 गावात “एक गाव एक पोलीस” योजना

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे ग्रामीण पोलीस दलाने पोलीस व जनता यांच्यातील दुरावलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तसेच गुप्त माहिती गोळा करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था उत्तम प्रकारे राहण्यासाठी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी “एक गाव, एक पोलीस पाटील, एक पोलीस अंमलदार” ही नवीन तंत्रज्ञान -सक्षम योजना १ मे २०२५ पासुन संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये राबवित आहेत. त्या अंतर्गत पुणे ग्रामीण जिल्ह्यात एकुण १३ तालुके, ३३ पोलीस स्टेशन, व १५७४ गावे व बऱ्याच वाडया वस्त्या समाविष्ठ आहेत. सदर योजनेकरीता १२९२ पोलीस पाटील व १५२५ पोलीस अंमलदार हे प्रत्येक गावाकरीता नेमण्यात आले आहेत. सदर योजनाकरीता “सुरक्षित पुणे ग्रामीण” या मोबाईल अॅपद्वारे पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यांची नोंदणी करण्यात आली आहे.

सुरक्षित पुणे ग्रामीण या मोबाईल अॅपद्वारे पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यांनी गाव भेट देताना, त्यांचे जिओ टॅग लोकेशन व फोटो अपलोड करणे अपेक्षित आहे. जेणे करुन, प्रभावीपणे ही योजना अंमलात आणता येईल.

एक गाव आणि बारा भानगडी, असे म्हणत गावातील भांडणातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झाले आहे. याशिवाय गावपातळीवर पोलीसांची प्रतिमा निरोगी व परस्पर विश्वासाच्या वातावरणाची निर्मीती व्हावी याकरीता गावातील पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यांमध्ये समन्वय साधून ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याकरीता, पोलीस व जनतेमध्ये विश्वास निर्माण करुन, सामुदायिक पोलीसिंगला (community policing) चालना देणे, महिला व बालकांच्या संबंधित गुन्हयामध्ये तातडीने कारवाई करणे व त्यांना योग्य न्याय मिळवुन देणे हा या उपक्रमाचा उददेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button