क्राईम

Crime News: जेजुरी: गुळूंचे येथील बालविवाह रोखण्यात पोलीसांना यश

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावच्या हद्दीत माळवस्ती येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी जेजुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विवाह सोहळा थांबवला.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार गुळुंचे गावचे पोलीस पाटील यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून गणेश पोपट जाधव (वय २७ वर्ष), मंदाबाई पोपट जाधव दोघे रा. माळशिरस पुरंदर, लता लहुजी गोरगल, लहुजी रामचंद्र गोरगल दोघे रा.गुळुंचे आणि किरण यबुप्रसाद पौडेल रा. दत्तघाट पाडेगाव या पाच जणांविरोधात बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ चे कलम ९, १० व ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button