आपला जिल्हा

News: कौतुकास्पद! जेजुरीला खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची दोन लाखाची हरवलेली अंगठी मिळाली परत एक विद्यार्थी व महिलेचा प्रामाणिकपणा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी पुण्याहून आलेल्या एका भाविकांची दोन तोळ्यांची सोने व रत्नजडित असलेली अंगठी हरवली होती. जेजुरी येथील एका विद्यालयातील विद्यार्थी व या परिसरात राहणाऱ्या महिलेला ही अंगठी सापडली. या दोघांनी सदर अंगठी प्रामाणिक पणे भाविकाला परत केली. श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाने या दोघांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की बुधवार दि. २६ जून २०२४ रोजी रोजी पुणे, मंडई दगडूशेठ मंदिरा जवळ राहणारे हे भाविक राजेंद्र परदेशी आपले परिवारातील एका विकलांग व्यक्तीला श्री खंडोबा मंदिरावर दर्शनासाठी आपत्कालीन मार्गाने गडावर जात असताना त्यांच्या हातामधील २ तोळ्याची रत्नजडित साधारण सुमारे २ लाख रुपयांची सोन्याची अंगठी बोटामधून गहाळ झाली.

आपत्कालीन गेट जवळ असणाऱ्या दादा जाधवराव विद्यालयामधील इयत्ता 8 वी मध्ये शिकणार विद्यार्थी गिरीधर सुरेश शिंदे हा विद्यालयात जात असताना व गेट जवळ भंडार- खोबरं, प्रसाद विकणाऱ्या सौ सुंदर चंद्रकांत घाडगे यांना ही अंगठी सापडली. सौ. सुंदर घाडगे यांनी सदरील अंगठी जेणेकरून कोणी चौकशीसाठी आले तर परत देता येईल या भावनेनं ही अंगठी स्वतःकडे ठेवून घेतली.

एक तासातच गडावरून दर्शन घेऊन परत पुण्याकडे निघालेले राजेंद्र परदेशी हे भाविक सासवड येथे आल्यानंतर अंगठी गहाळ झाल्याचे लक्षात आले . अंगठी शोधण्यासाठी व चौकशीसाठी आपत्कालीन गेट जवळ आले या अंगठीची शोधाशोध करीत असताना सौ घाडगे यांना सदरील अंगठी याच भाविकांची असल्याचे लक्षात आले. या वेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल रावसाहेब सौंदडे आपत्कालीन गेट जवळच उपस्थित होते. त्यांनी सदरील अंगठी भाविकांला ओळख पटवून घेऊन २ तोळ्याची अंगठी परत दिली. भाविकांनी त्या विद्यार्थ्याचे व सौ. सुंदर चंद्रकांत घाडगे यांचे तसेच देवसंस्थानचे मनापासून आभार मानले.

श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्तांनी प्रामाणिक महिला व विद्यार्थ्याचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button