क्राईम

Crime News: जेजुरी होळकर तलावामध्ये सापडला अनोळखी मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक 20/01/2024 रोजी दुपरी 01:30 वा जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत जेजुरी होळकर तलाव यामध्ये एक अनोळखी पुरुष जातीचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष मयत अवस्थेत पाण्यावर तरंगत मिळून आला. सदर मयताच्या अंगावर फक्त निळे रंगाची अंडरवेअर आहे सदर मयताचे दावे दंडावर मारुतीचे चित्र गुण दिले दिसत आहे. तसेच उजवे हातावर दंडावर नागाचे चित्र गोंदलेले आहे. उजव्या हाताचे पोटरीवर आदिनाथ असे मराठीत गोंदलेले आहे. सदर मयताचा नाव व पत्ता समजून येत नाही.

सदरचे मयता बाबत संदीप पांडुरंग मेमाणे रा. जेजुरी यांनी खबर दिली आहे. त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन आकसमत मयत रजिस्टर नंबर 10/ 2024 CRPC 174 प्रमाणे दिनांक 20/01/2024 रोजी दाखल असून सदर मयताचा पुढील तपास पोलीस नाईक नांदेड बक्कल नंबर 2359 हे करीत आहेत.

तरी सदर मयता बाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.
संपर्क क्र. 02115- 253129

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button