News: देशसेवा करण्यासाठी, प्रशासकीय सेवेत येण्यासाठी जिद्द व चिकाटीने प्रयत्न करा: सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): देश सेवा हि सर्वात मोठी सेवा आहे. शिक्षणाच्या माध्यमातून जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी ठेवून शासकीय सेवेत संधी मिळावा,त्यातून गाव, समाज व देशाची सेवा करा. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून त्यांना समाजात मान सन्मान मिळवून द्या असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांनी केले.
जेजुरी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या जिजामाता माध्यमिक व ज्युनियर महाविद्यालात शिवजयंती व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेछ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे बोलत होते. ते पुढे म्हणाले शैक्षणिक अवस्थेत मोबाईल पासून विद्यार्थ्यांनी स्वताला दूर ठेवले पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यामातून स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून जीवांच्या उच्चपदावर पोहोचण्याचा पर्यंत करा.

यावेळी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य यांनी आधुनिक युगात टिकण्यासाठी जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर प्रचंड कष्ट,मेहनत करून यश प्राप्त करावे लागणार आहे. आई वडील,समाज यांची सेवा करण्यासाठी संस्कारक्षम होणे आवश्यक आहे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक सचिन सोनावणे, भाजपचे जिल्हा सदस्य सचिन पेशवे, जेजुरी देवसंस्थानचे माजी विश्वस्त रोहित घाटे, मुख्याधापिका गायत्री बेलसरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे समन्वयक प्रल्हाद गिरमे, बी के जागताप, सोमनाथ उबाळे, वर्षा देसाई, लीना पायगुडे आदींनी केले.
या कार्यक्रमात जिजामाता बुद्धिमत्ता शोध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.