क्राईम

Crime News: रात्रीची चोरी व दिवसा मोटार सायकल चोरी करणारा सुशिक्षीत तरूण गजाआड करून 12 गुन्हे उघडकीस आणून 3 लाख 22 हजार रू. चा मुद्देमाल केला हस्तगत: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): रात्रीचे वेळी बंद केलेले परमिट बार हॉटेलची खिडकी, दरवाजे उचकटून आत प्रवेश करून रोख रक्कम व दारूच्या बाटल्या असा माल चोरी जात असल्याच्या पाच घटना यवत पोलीस स्टेशनचे हद्दीत घडल्या होत्या. प्रत्येक घटनेत एक इसम हातात कुन्हाड घेवून चोरी करत असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनांमध्ये अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व घटनास्थळांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेटी देवून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सर्व घटनांमध्ये एक इसम हातात कुऱ्हाड घेवून चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. घटनाक्रम व घटनास्थळ पडताळले असता चोरी करणारा इसम हा चोरी करून दौंड-काष्टी बाजूकडे जात असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झालेने तपास पथकाने काष्टी परीसरातील गोपनीय बातमीदारांना सतर्क करून माहिती प्राप्त केली आणि गोपनीय माहितीचे आधारे आदित्य बाळासाहेब कवडे (वय २१ वर्षे) रा. कोळगाव मानमोटी घारगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यास ताब्यात घेण्यात आले. त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी करता तो उच्चशिक्षीत असून त्याने यवत, बारामती, श्रीगोंदा परीसरातील हॉटेलचे खिडक्या व दरवाजे उचकटून चोरी केली असून मोटार सायकल देखील चोरी केल्या असल्याचे कबूल केले. त्याचेकडून तपासादरम्यान रोख रक्कम व तीन मोटार सायकल असा एकूण ३,२२,०००/- किं. चा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला असून एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.

१) यवत १६६०/२०२३ भादंवि ४५७,३८०
२) यवत १७४६/२०२३ भादंवि ४५७,३८०
३) यवत १३८६/२०२३ भादंवि ४५७,३८०
४) यवत १४८८/२०२३ भादंवि ४५७,३८०
५) यवत १७४९/२०२३ भादंवि ४५७,३८०
६) बारामती तालुका 912/2023 IPC 457,380
७) बारामती तालुका 923/2023 BHDV 379
८) बारामती शहर १००४/२०२३ भादंवि ३७९
९) दौंड ११९२/२०२३ भादंवि ३७९
१०) श्रीगोंदा ९१९/२०२३ भादंवि ३७९
११) श्रीगोंदा ८८९/२०२३ भादंवि ३७९
१२) हडपसर १९१०/२०२३ भादंवि ३७९

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पो स्टे चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्था.गु.शा. कडील सपोनि कुलदीप संकपाळ, पो.स.ई. अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, आसीफ शेख, अजित भुजबळ, निलेश शिंदे, राजू मोमीण, अतुल डेरे, यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button