Crime News: रेकॉर्डवरील गुन्हेगार चार गावठी पिस्तुल, बारा काडतूस, तीन मॅग्झीन सह केला जेरबंद एकूण 1,82,000/- रू. किं चा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दि. २६/०३/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करण्याचे अनुषंगाने गस्त करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी नामे सुरज राजेश पाडळे रा. सोनेसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे याचेकडे अवैध गावठी पिस्तुल असून तो सध्या त्याचे राहते घरी सोनेसांगवी येथे आहे, अशी बातमी मिळालेने स्था.गु.शा. चे पथकाने दोन पंचांसह सोनेसांगवी येथे जावून त्याचे राहते घरी छापा कारवाई करून रेकॉडूवरील गुन्हेगार नामे सुरज राजेश पाडळे, (वय २७ वर्षे), रा. सोनेसांगवी, ता. शिरूर जि. पुणे यास विश्वासात घेवून चौकशी केली असता, १) सुरज पाडळे, त्याचा मित्र नामे २) संकेत संतोष महामुनी रा. सरदवाडी, ता. शिरूर जि.पुणे, व इतर दोन मित्र यांनी मध्यप्रदेश येथे जावून प्रत्येकी एक प्रमाणे चार गावठी पिस्तुल विकत घेतले असून त्यासोबत जिवंत काडतूस व अधिकचे मॅग्झीन आणले असल्याचे सांगितले. त्यानंतर गुन्हेगार नामे सुरज पाडळे याने त्याचे कंबरेला खोवलेले गावठी पिस्तुल व इतर तिघांनी त्याचे कडे ठेवण्यासाठी दिलेले गावठी पिस्तुले व काडतुस, मॅग्झीन काढून दिली. गुन्हेगार नामे सुरज राजेश पाडळे याचे कब्जातून एकूण ०४ गावठी पिस्तुल, १२ जिवंत काडतूस, ०३ मॅग्झीन असा एकूण १,८२,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. आरोपी सुरज राजेश पाडळे याचेसह इतर तिघांवर शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नोंद ९७/२०२५ भा.ह.का. ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे. त्यांनी सदरचे अवैध गावठी पिस्तुल खरेदी करण्यामागे व बाळगण्यामागे त्याचा नेमका कोणता हेतू आहे याकरीता पुढील तपास चालू असून अटक आरोपीस न्यायालयात हजर करेणत आले असता, न्यायालयाने त्याची दि. ०२/०४/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली असून स्था.गु.शा. व रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत.

सदर कारवाईतील आरोपी सुरज पाडळे व संकेत महामुनी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर यापुर्वी शरीराविरूद्धचे व आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेकडून चालु वर्षात अवैध अग्निशस्त्र बाळगणारे आरोपीवर कारवाई करत एकूण ०७ अवैध अग्निशस्त्र १७ जिवंत काडतूस हस्तगत करणेत आलेले आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक सारे, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांचेकडून पुणे ग्रामीण जिल्हयाची वार्षिक तपासणी चालू असनू दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करून मोठ्या प्रमाणात अवैध अग्निशस्त्र साठा हस्तगत करणेत आल्याने पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, अमोल शेडगे यांनी केली आहे.