Crime News: अंमली पदार्थाची विक्री करण्याचे उद्देशाने अंमली पदार्थ मेफेड्रोन जवळ बाळगणाऱ्या महिलेवर कारवाई करून मेफेड्रोन पावडर सह 3,17,100/- किं.चा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे ग्रामीण जिल्हयात अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे इसमांवर कारवाई करण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी मागील काही दिवसांपासून कारवाईचा बडगा चालू ठेवला आहे.

दि.04/03/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शिक्रापुर पोलीस स्टेशनकडील पथकासह शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधकामी व अवैध व्यवसायांवर कारावाई करण्यासाठी खाजगी वाहनाने शिक्रापूर पो स्टे हद्दीत हजर असताना स्था.गु.शा.चे पथकातील पोहवा तुषार पंदारे यांना बातमी मिळाली की, कोरेगाव भिमा येथे डिंग्रजवाडी फाटा येथे एक महिला संशयास्पद हालचाली करत असून ती तिचेजवळील पर्समधून एक लहान पिशवी काढून रस्त्याने जाणारे-येणारे व्यक्तींना दाखवित आहेत, अशी बातमी मिळाल्याने वरिष्ठ अधिकारी यांची परवानगी घेवून डिंग्रजवाडी फाटा, कोरेगाव भिमा ता. शिरूर जि पुणे येथे कायदेशीर कारवाई करत महिला नामे जबीन जावेद शेख (वय 38 वर्षे), रा. गल्ली नंबर 2, पिंपळे गुरव, पुणे हिला ताब्यात घेण्यात आले तिचे ताब्यातून पर्समधून प्लास्टिकची पारदर्शक पिशवी व त्यामध्ये हाफव्हाईट रंगाची 15.85 ग्रॅम वजनाची पावडर (मेफेड्रोन अंमली पदार्थ ) व रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकुण 3,17,100/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद महिला आरोपीस पुढील कार्यवाहीकामी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर उपविभागीय यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पो.स्टे. चे पो.नि. दिपरतन गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, सागर धुमाळ, शिक्रापुर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार नवनाथ नाईकडे, रोहीत पारखे, शिवा चितारे, महिला अंमलदार पुजा सावंत यांनी केली असून पुढील तपास शिक्रापुर पोलीस स्टेशन करत आहे.



