आपला जिल्हा

News: रास्त भाव दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १३ तालुक्यांमध्ये ४४६ ठिकाणी रास्त भाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्याच्या अनुषंगाने १५ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.pune.nic.in या संकेतस्थळावर हा जाहीरनामा उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधीत तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.

तहसील कार्यालयात परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी ३० जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ असा असून तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत; मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी पसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button