निवडणूक

News: पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): भारत निवडणूक आयोगाकडून पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे.

सुमित कुमार यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०२ असा असून संपर्क क्रमांक ९९६९२९८४१५ असा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी गणेश लालासो सस्ते हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९८९०९४९५८७ असा आहे. सुमित कुमार सकाळी १० ते १२ या वेळेत व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे या ठिकाणी भेटतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती लांडगे यांनी दिली आहे.

सुमित कुमार यांनी बुधवारी (२३ ऑक्टोबर) रोजी पुरंदर विधानसभा मतदारसंघ कार्यालयास भेट दिली. तसेच प्रत्येक कक्षाची माहिती घेऊन त्यांनी निवडणूक कामकाजाविषयी मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के, निवडणूक खर्च कक्ष समन्वयक अधिकारी सुनिल परदेशी, आचार संहिता कक्ष समन्वयक डॉ.अमिता पवार, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक संभाजी बर्गे आदी समन्वय अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button