Crime News: होणारा नवरा पसंत नसल्याने महिलेने दिली जिवे ठार मारण्याची सुपारी; सुपारी घेणाऱ्या आरोपींना पोलीसांनी केले जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दि. २७/०२/२०२५ रोजी सायं. ०७.५० वा.चे सुमारास मौजे खामगाव गावचे हद्दीत हॉटेल साई मिसळ समोर सोलापूर-पुणे हायवे रोडवर पांढरे रंगाचे चारचाकी गाडीतील अज्ञात इसमांनी गाडीचे खाली उतरून जर तु मयूरीशी लग्न केले तर तुला दाखवितो असे म्हणून फिर्यादी नामे सागर कदम यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. वगैरे मजकुरावरून दि. ०१/०३/२०२५ रोजी यवत पोलीस स्टेशनला गु. रजि. नं. २१७/२०२५ भा. न्या. सं. कलम ११८(१), ३५२, ३५१ (२) (३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात होता.

सदर गुन्हयाचे तपास दरम्यान दि. २८/०३/२०२५ रोजी संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे, (वय १९ वर्षे), रा. गुधलवडगाव ता. श्रीगोदा जि. अहिल्यानगर यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा मयुरी सुनिल दांगडे, रा.ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर आणि संदीप दादा गावडे, (वय ४० वर्षे), रा. गुघलवडगाव ता. श्रीगोदा जि. अहिल्यानगर यांचे सांगणेवरून मयुरीला होणारा नवरा सागर कदम हा पसंत नसल्याने १,५०,०००/-रू.ची सुपारी घेवून मी व १) शिवाजी रामदास जरे, रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर २) इंद्रभान सखाराम कोळपे, (वय ३७ वर्षे), रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर ३) सुरज दिगंबर जाधव (वय ३६ वर्षे), रा. काष्टी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर यांनी मयूरी दांगडे हिचा होणारा नवरा सागर कदम याला मारहाण केले असल्याचे सांगितले.
तरी सदर गुन्हयाचा घटनाक्रम पाहता आरोपी नामे आदित्य दांगडे, मयुरी दांगडे, संदीप गावडे, शिवाजी जरे, इंद्रभान कोळपे, सुरज जाधव यांनी कट रचून यातील फिर्यादी नामे सागर कदम यास जिवे ठार मारण्याचे उददेशाने यवत पोलीस स्टेशन हदिदतील खामगाव फाटा येथे सोलापूर-पुणे हायवेवर अडवून लाकडी दांडक्याचे सहायाने जबर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून सदर गुन्हयात भा. न्या. सं. कलम १०९, ६१ (२), १२६ (२) ही वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. तरी सदर गुन्हयातील महिला आरोपी नामे मयुरी दांगडे ही अदयाप फरार आहे. बाकी आरोपींना पोलीसांना ताब्यात घेण्यात आले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि महेश माने हे करत आहेत.

सदरची कामगिरी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिराजदार अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, बापुराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यवत पोलीस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक महेश माने, सहा, पोलीस निरीक्षक प्रविण संपांगे पोसई सलीम शेख, पोसई किशोर वागज, पोसई मारोती मेतलवाड, पो. हवा./१८३३ कर्चे, पो.हवा./१९२९ गायकवाड, पो. हवा./१६०० देवकर, पो. हवा./२२४२ काळे, पो. हवा./२०८२ चांदणे, पो.हवा./२१८१ यादव, पो. हवा./२३४४ कापरे, पो. कॉ. / २६५८ बाराते, पो. कॉ./१७१८ गरूड, पो.कॉ./३२१५ भानवसे यांनी केली आहे.