Crime News: परराज्यातील कामगारांचे मोबाईल चोरनारे 02 आरोपींना पोलीसांनी केले अटक; आरोपींकडुन 1,05,000/- रु किमतीचे 08 मोबाईल केले जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अर्जुन निर्मल चौहान (वय २९ वर्षे) धंदा मजुरी सध्या आशापुरा किराणा स्टोरस पाठीमागे ओके प्रॉपरटीज प्लॉट नं २ विजय उत्तम वाघमारे यांचे खोलीत कोरेगाव ता. शिरूर, जि. पुणे मुळ रा. गाव बडहराबाबु चौहान टोला, ता. कप्तान गंज जि. कुशीनगर राज्य उत्तर प्रदेश हे विजय वाघमारे याचे कंट्रक्शनचे कामावर बिगारी काम करत होते. ते सदर बांधकामावरच खोली करुन राहत होते. ते झोपले असताना दि. 05/09/2025 रोजी रात्रीचे 02/00 वा चे सुमारास तीन अज्ञात आरोपी यांनी त्यांचे कडील एकुण 40,000/- रु किमतीचे एकुण 04 मोबाईल चोरी करून जात असताना कामगारांना जाग आल्याने त्यांनी आरडा ओरड केल्याने चोरटे मोबाईल घेउन पळुन गेले होते. सदर बाबत कामगारांनी पोलीसांना फोन करुन पोलीस मदत घेतली. पोलीस व कामगांरानी परीसरात सदर आरोपींचा शोध घेतला असता दोन आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आले. सदर बाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात होता.

सदरचा गुन्हा हा गंभिर स्वरुपाचा असल्याने व वारंवार कंन्ट्रक्शनचे कामावर असणारे परराज्यातील गरीब कामगारंचे मोबाईल फोन चोरीला जाणे ही बाब गंभिर असल्याने सदर गुन्ह्यात महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोसई ए सी थोरात, सहा फौज दत्तात्रय शिंदे, पो हवा राजेश ढगे, पो हवा नितिन भोस, पो काँ गणेश वाघ, पो कॉ उमेश कुतवळ, पो काँ योगेश गुंड व पो काँ किशोर शिवणकर, पो काँ संदिप भांड यांना योग्य त्या सुचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यातील 40,000/- रु किमतीचे 04 मोबाईल फोन हे जप्त करण्यात आले आहे, सदर आरोपी यांनी अशाच प्रकारचे अनेक गुन्हे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत व रांजणगाव एमआयडीसी हद्दीत केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे कडे अधिक चौकशी करता त्यांचे कडुन आणखीन 65,000/- रु किमतीवे 04 मोबाईल जप्त करण्यात आले, सदर बाबत रांजणगाव पोलीस स्टेशन कडील एकुण 02 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक संदिप सिंह गिल्ल, रमेश चोपडे अप्पर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, प्रशांत ढोले उपविभागिय पोलीस अधिकारी शिरुर विभाग शिरूर, यांचे मार्गदर्शना खाली महादेव वाघमोडे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोराई अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पो हवा राजेश ढगे, पो हवा नितिन भोस, पो काँ गणेश वाघ, पो कॉ उमेश कुतवळ, पो कॉ योगेश गुंड व पो काँ किशोर शिवणकर,, पो काँ संदिप भांड यांनी केली आहे सदर गुन्हायावा तपास सहा फौजदार दत्तात्रय शिंदे व पो हवा अभिमान कोळेकर हे करीत आहे.



