आपला जिल्हा

News: जेजुरीत आयोजित समन्वय बैठकीत समस्यांवर नागरिक आक्रमक

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलिस ठाणे व नगरपरिषद आयोजित समन्वय बैठकीत जेजुरीत विकला जाणारा भेसळयुक्त भंडारा व पेढे यावर कारवाई व्हावी, वाहनकर रद्द करावा, पार्किंगची व्यवस्था करावी, स्वच्छतागृहांचा अभाव, चिंचेची बाग प्रशासनाने ताब्यात घ्यावी, गडावरील अतिक्रमणे त्वरित काढावीत, जेजुरीची बदनामी थांबवावी, भाविकांना होणारी अरेरावी, मारहाण यावर कारवाई व्हावी, आदी प्रश्नाबाबत जेजुरीकर नागरिकांनी चर्चा केली.

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत अलीकडील काळात भाविक व नागरिकांच्या झालेल्या वादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातून जेजुरी शहराची बदनामी होत असल्याने यावर नागरिकांशी चर्चा होऊन उपाय योजना करण्यासाठी जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने येथील मल्हार नाट्यगृहात समन्वय बैठीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत जेजुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगर-सेवक, जेजुरी देवसंस्थानचे विश्वस्त, ग्रामस्थ, मंडळाचे पदाधिकारी, व्यापारी, पुजारी, सेवकवर्ग आदी उपस्थित होते.

जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या पुढाकारातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यांनी समन्वय व शांततेच्या मार्गातून उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.

मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी पार्किंग व्यवस्था व स्वच्छता गृहांची कामे लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीस देवसंस्थानचे अध्यक्ष विश्वास पानसे, विश्वस्त पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे तसेच नगरसेवक व मोठ्या संख्येने जेजुरीकर नागरिक उपस्थित होते. या वेळी मयूर माळवदकर, सदानंद बारभाई, गिरीश झगडे, संदीप जगताप, नीलेश जगताप, विजयकुमार हरिचंद्र, अलका शिंदे, लता लांघी आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button