News: खुनाचा प्रयत्न व फायरींग गुन्हयातील आरोपींस 24 तासाच्या पोलीसांनी घेतले ताब्यात

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ४२/२०२६ भान्यासं कलम १०९(१), १८९(४), १९१(३), १९१(३), ३२४(४), ३५१ (२), ३५१(३), ३५२ व शस्त्र अधिनियम ३/२५, ४/२५ म.पो. अधि १९५१ चे कलम १३५ प्रमाणे दि.२४/०५/२०२६ रोजी रात्री १० वा चे दरम्यान घडलेल्या गुन्हयात कोदवडी फाटा येथील हॉटेल मध्ये पुर्वीच्या झालेल्या भांडणाचे कारणावरून हॉटेल मालक मस्कु दसवडकर व वेटर दशरथ शिळीमकर यांना आरोपींनी हॉटेलमध्ये येवुन कोयत्याने वार करून जखमी करून हवेत फायर करून गणेश धरपाळे व त्याचे साथिदार गुन्हा करून फरार झाले होते. घडलेल्या घटनेबाबत मस्कु दसवडकर यांनी फिर्याद दिली असुन गुन्हयाचा तपास चालु असताना गोपणीय माहितीचे आधारे आरोपी हे गुन्हा केल्यानंतर सुरवड, वांजळे गावचे परिसरात डोंगरात लपुन बसल्याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर वेल्हे पोलीस स्टेशनकडील अधिकारी व स्टाफ यांनी आरोपी यांना ताब्यात घेवुन वेल्हे पोलीस स्टेशन येथे आणले आहे.
गुन्हयात एकुण ०४ आरोपी निष्पण्ण झाले असुन त्यापैकी ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. आरोपींची नावे १) गणेश उर्फ तनेश तानाजी धरपाळे, (वय २१ वर्षे), रा. वांजळे, ता.वेल्हे, जि.पुणे २) ओंकार सुरेश इंगुळकर, (वय १९ वर्षे), रा. सुरवड, ता. वेल्हे, जि.पुणे ३) विशाल आप्पा इंगुळकर, (वय २४ वर्षे), रा.सुरवड, ता. वेल्हे, जि.पुणे अणि ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक आहे.
आरोपी यांना पोलीस स्टेशन येथे घेवुन आल्यानंतर अटकेची प्रक्रिया चालु असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख हे करत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक, संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक, गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक, किशोर शेवते, पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, पो.हवा. सोमेश राउत, पो.शि आकाश पाटील, पो.शि अजय गार्डी, पो.शि बुदधीवान मोरे, चालक सचिन जाधव व पोलीस स्टेशनकडील स्टाफ यांनी केली आहे



