आपला जिल्हा

News: जेजुरीत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या आदेशानुसार जेजुरी येथे शुक्रवार (दि. १५) रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ टप्पा-१ चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महसूल, आरोग्य व विविध शासकीय योजनांशी संबंधित सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या शिबिराचे उद्घाटन आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते होणार असून, जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे तसेच नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. शिबिरासाठी विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, मुख्याधिकारी चारुदत्त इंगुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार राजपूत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button