शैक्षणिक

News: शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची (महाटीईटी) अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.

परीक्षेची अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक १ व २ च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप २७ डिसेंबर पर्यंत मागविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन,आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

या अंतिम उत्तरसूचीनुसार परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याचीही संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button